शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतींच्या दुरूस्तीला मुहूर्त, सार्वजनिक बांधकाम विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 03:26 IST

पुणे शहर व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या वसाहतींच्या दुरूस्तीचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व पोलीस वसाहतींच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी सहा कोटी ३० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.

पुणे - पुणे शहर व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्या वसाहतींच्या दुरूस्तीचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्व पोलीस वसाहतींच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी सहा कोटी ३० लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.पुणे शहर व परिसरात कार्यरत पोलीस कर्मचाºयांसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे १२ ते १३ वसाहती बांधण्यात आल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या वसाहतींची दुरवस्था झाली होती. त्यामुळे वसाहतीमध्ये राहणाºया कर्मचाºयांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते.सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याबाबत तक्रारी देऊनही प्रश्न सुटत नव्हता. त्यामुळे कर्मचाºयांकडून संताप व्यक्त केला जात होता. त्यातच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात पुण्यात झालेल्या आर्थिक नियोजनाच्या बैठकीत पोलिसांच्या वसाहतींच्या दुरवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, अजूनही शासनाकडून वसाहतीच्या डागडुजीसाठी निधी प्राप्त झालेला नाही. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वत: पुढाकार घेऊन या वसाहतींच्या दुरूस्तीची कामे हाती घेतली आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भारतकुमार बाविस्कर म्हणाले, ‘‘सध्या पोलीस वसाहतींची कामे युद्धपातळीवर केली जात आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व वसाहतींची दुरूस्ती केली जाणार असून, त्यासाठी सहा कोटी ३० लाखांचा निधी खर्च केला जाईल.शासनाकडून हा निधी येणे अपेक्षित आहे. पावसाळ्यात इमारतीला होणारी गळती, जलवाहिनी, गटारे आदी कामे प्राधान्याने केली जात आहेत. चार इमारतींच्या दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे.शिवाजीनगर परिसरातील मॉडर्न महाविद्यालयाजवळील पोलीस वसाहतीच्या डागडुजीस काही दिवसांपूर्वी सुरूवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातील वसाहतींच्या दुरूस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेवले आहे.निधीअभावी काम रखडू नये यासाठी निविदा काढून कामास सुरूवात केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक पोलीस वसाहतीमधील रहिवाशांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जात आहे. कोणती कामे प्रथम पूर्ण होणे आवश्यक आहे, हे तपासून संबंधित कामे प्राधान्याने केली जात आहेत.

टॅग्स :Policeपोलिसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड