शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
2
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
3
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
4
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
5
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
6
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
7
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
8
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
9
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
10
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
11
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
12
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
13
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
14
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
15
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
16
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
17
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
18
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
19
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...

लोकसेवा हक्क कायद्याला महापालिकेत केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 10:13 PM

महापालिकेने नागरिकांच्या सेवेसाठी त्वरीत आणि काटेकोरपणे या कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे कायद्याची अंमलबजावणी करा:  दिपस्तंभ संस्थेची मागणी

पुणे :  राज्यातील नागरिकांना निश्चित केलेल्या वेळेत शासकीय सेवा सुविधांचा लाभ मिळावा यासाठी शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ आणि त्याखाली नियम २०१६ हा कायदा लागू केला आहे. परंतु पुणे महापालिकेत या कायद्याला केराची टोपली दाखवली आहे.  त्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी त्वरीत आणि काटेकोरपणे या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महापालिकेचे माजी अधिकारी आणि दिपस्तंभ संस्थेचे अध्यक्ष के.सी. कारकर यांनी लेखी निवेदनाद्वारे आयुक्ताकडे केली आहे.    या कायद्यानुसार अर्जासोबत जोडावयाच्या सर्व कागदपत्रांची माहिती व नियम सूचना फलकावर प्रसिद्ध करणे गरजेचे आहे, अर्जा केल्यानंतर पोहच पावती देणे व यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करणे बंधनकारक आहे. परंतु महापालिकेने यासाठी कोणताही दुय्यम अधिकारी प्राधिकृत केलेला नाही, अर्ज स्विकारणाऱ्या अधिका-याचे नाव सूचनाफलकावर लावले जात नाही, महापालिकेकडून दिल्या जाणा-या सेवांसाठी अर्ज आल्यानंतर दिलेल्या पोहोचवर स्विकारणा-या अधिका-याचे नाव आणि काम केव्हा होईल याची दिनांक टाकली जात नाही, त्यामुळे कामासाठी नागरिकांना महापालिकेत हेलपाटे मारावे लागतात. प्राप्त अर्जाची नोंदवही असणे आवश्यक असताना ती महापालिकेकडे नाही. आदी गोष्टींची त्वरीत व्यवस्था करून नागरिकांची सोय करावी, अशी मागणी कारकर यांनी केली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका