शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डीएसकेच्या मालमत्तांचा जाहीर लिलाव करा; कोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 07:05 IST

सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य शासनाने जप्त केलेल्या बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी, असा आदेश सोमवारी विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिला आहे.

पुणे : सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि राज्य शासनाने जप्त केलेल्या बांधकाम व्यावसायिक डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव करण्यासाठी जाहीर नोटीस काढावी, असा आदेश सोमवारी विशेष न्यायाधीश जयंत राजे यांनी दिला आहे.ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके आणि त्यांचे नातेवाईक यांच्या ४६३ स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ठेवीदारांचे पैसे परत मिळावे म्हणून त्यांची विक्री करावी, अशी मागणी ठेवीदारांकडून करण्यात आली आहे़त्यानुसार न्यायालयाने या संपत्तीची विक्री करण्याबाबत जाहीर नोटीस काढावी, असे आदेश दिले आहेत.संपत्तीची विक्री केल्यानंतर मिळालेले पैसे पहिल्यांदा डीएसके यांनी ज्या बँकांतून कर्ज घेतले त्यांना देण्यात येतील. शिल्लक राहिलेले पैसे ठेवीदारांना देण्यात येतील. पुणे, वणी आणि लोणावळा यासह राज्यभरात डीएसके यांची मालमत्ता आहे.त्यांच्या विक्रीतून सुमारे दीड हजार कोटी रुपये जमा होऊ शकतात, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली.डीएसके यांची मेहुणी अनुराधा पुरंदरे आणि लेखापाल धनंजय पाचपोर यांच्या जामिनावर २४ जानेवारी रोजी युक्तिवाद होणार आहे. डीएसके यांचे भाऊ मकरंद कुलकर्णी यांना जामीन मिळावा म्हणून त्यांचे वकील रोहन नहार यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यावर २४ जानेवारी रोजी सरकार पक्ष म्हणणे सादर करणार आहे.वाहनांचा लिलाव१५ फेब्रुवारीलाडीएसके यांच्याकडे ४६ वाहने असून त्यातील २० जप्त केली आहेत. यापैकी १३ आलिशान गाड्यांचा १५ फेब्रुवारी रोजी लिलाव होणार आहे. या वाहनांची किंमत २ कोटी ५७ लाख ५० हजार रुपये आहे.डी.एस.कुलकर्णी यांनी सोमवारी न्यायालयाला नवीन प्रस्ताव दिला आहे़ डी. एस. के यांचे काही प्रकल्प बंद पडले आहेत. न्यायालयाने बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदाची नेमणूक करुन प्रकल्प पूर्ण करावे. त्यातून १० हजार कोटी मिळतील. ४० टक्के रक्कम ही बांधकाम व्यावसायिकाला द्यावी व उर्वरित रक्कम गुंतवणूकदाराला द्यावी, असा प्रस्ताव न्यायालयात दिला आहे. यावर न्यायालयाने मालमत्ता का जप्त का करू नये, अशी नोटीस बजावली असून ३ फेब्रुवारीला सुनावणी आहे.

टॅग्स :Courtन्यायालय