शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

टंचाईग्रस्त भागांना त्वरित पाणीपुरवठा करा - विश्वास देवकाते  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 03:38 IST

जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील परिस्थितीचा अभ्यास करून ज्या गावांना पाण्याची टंचाई आहे; त्यांना त्वरित पाणीपुरवठा करण्यात यावा. तसेच टंचाई दूर करण्यासाठी गेल्या वर्षातील आणि या वर्षी आलेले सर्व प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी शुक्रवारी बोलावलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.

पुणे - जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील परिस्थितीचा अभ्यास करून ज्या गावांना पाण्याची टंचाई आहे; त्यांना त्वरित पाणीपुरवठा करण्यात यावा. तसेच टंचाई दूर करण्यासाठी गेल्या वर्षातील आणि या वर्षी आलेले सर्व प्रस्ताव मंजूर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी शुक्रवारी बोलावलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या. याबरोबरच तालुकास्तरावरील सर्व अधिकाºयांना निमंत्रित करून पाणीटंचाईचा अभ्यास करताना सर्व अधिकाºयांनी प्रत्यक्ष पाहणी करून तालुकानिहाय माहिती घ्यावी, अशा सूचनाही देवकाते यांनी दिल्या. जिल्ह्यात पाणीटंचाई करण्यासाठी नव्या विंधन विहिरी, जलयुक्त शिवार योजना, पाणी अडवा पाणी जिरवा मोहिमेअंतर्गत अनेक योजना राबविण्यात आल्या. यामुळे भूगर्भातील पाणीसाठा वाढविण्यास या वर्षी मोठी मदत झाली. गेल्या वर्षी मे महिन्यात २७ गावे आणि २८० वाड्यावस्त्यांवरील ७६ हजार ८५२ नागरिकांना ३४ टँकरच्या साह्याने पाणी पुरविले जात होते. मात्र, टंचाईच्या झालेल्या कामांमुळे या वर्षी ३ गावे ८ वाड्यांसाठी २ टँकर सुरू झाले आहेत. येत्या काळात जिल्हा टंचाईमुक्त करण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात टंचाईची कामे हाती घेण्यात येणार आहे. याद्वारे जलयुक्त शिवारसारख्या मोहिमांना बळकटी देण्यात येणार असल्याचे देवकाते यांनी सांगितले.   जिल्ह्यातील गावे आणि वाड्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी यांनी ३३५३३.०६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार ३६७ नवीन विंधनविहिरी घेण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत त्यातील २५९ विहिरींच्या  खोदाईला सुरुवात करण्यात आली आहे. याबरोबरच ३७९ विंधनविहिरींच्या विशेष दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यातील २३८ कामे पूर्ण झाली आहेत. सध्या तीन विहीर अधिग्रहित करण्यात आले आहे. नळपाणीपुरवठा योजना दुरुस्तीअंतर्गत ११४ कामांना मजुरी मिळाली असून, त्यासाठी १३८९ लाखांचा निधी देण्यात आला आहे. तात्पुरती पूरक योजनेअंतर्गत २१ कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी २२३.०७ लाख एवढा निधी मिळाला आहे. विहीर खोलीकर तसेच गाळ काढण्याची ६४ कामे मंजूर करण्यात आली आहेत. ही सर्व कामे येत्या १५ मेपर्यंत पूर्ण होतील, असे आश्वासन अधिकाºयांनी दिले. जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील सोनोरी गावासाठी १ टँकर सुरू आहे आणि भोर तालुक्यातील भुतोंडे म्हसर बु. साठी २ टँकर सुरू आहेत. आंबेगाव येथे ५, हवेली येथे २ तसेच भोर, दौंड आणि वेल्हा येथे प्रत्येकी दोन असे एकूण १६ टँकर सुरू करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे आले आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपाययोजना केल्या जात आहे. त्या सर्व कामांचा वेग वाढवावा, टंचाईमध्ये जी गावे आहेत तेथील कामे करताना ती चांगल्या पद्धतीने करण्यावर प्राधान्याने भर देण्यात येणार आहे. त्याबाबत पाइपखरेदी ही जिल्हा परिषदेकडून करण्यात येणार आहे. भविष्यात जिल्हा पाणीटंचाईमुक्त होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. - विश्वास देवकाते,  अध्यक्ष, जिल्हा परिषद, पुणे  

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे