शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील‘या'प्रसुतीगृहाची अभिमानास्पद कामगिरी! कोरोनाग्रस्त मातांची १०९ अर्भके कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 13:34 IST

कोरोनाबाधित गर्भवतींच्या प्रसुतीसाठी महापालिकेची आरोग्य यंत्रणा सरसावली

ठळक मुद्देप्रसुतीनंतर १०९ बाळ-बाळंतीन कोरोनामुक्त होऊन घरी परतले 

नीलेश राऊत- पुणे : कोरोनाबाधित गर्भवती महिलेकडून जन्माला येणाऱ्या नवजात बालकाला कोरोनाची बाधा होऊ नये व बाळ-बाळंतीन दोघेही घरी परतताना कोरोनामुक्त होऊनच परतावे. या ध्येयाने कार्यरत असलेल्या पुणे महापालिकेच्या ‘सोनावणे प्रसुतीगृह’ येथून मे महिन्यापासून तब्बल १०९ कोरोनाबाधित महिलांच्या प्रसुती झाल्या असून, विशेष म्हणजे सर्व बाळ-बाळंतीन कोरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतले आहेत.     कोरोना आपत्तीत रूग्णालयाची पायरी चढताना, अन्य कारणास्तव दाखल होणाऱ्या प्रत्येकाचीच कोविड-१९ ची तपासणी संबंधित रूग्णालयाकडून करण्यात येत आहे. अशावेळी केवळ कोरोनाबाधित गर्भवती महिलांच्या प्रसुतीसाठी महापालिकेचे राज्य शासनाच्या सूचनेनुसार, २ मे पासून भवानी पेठेतील सोनावणे प्रसुतीगृह कोरोनाबाधित गर्भवतींच्या सेवेत रूजू झाले आहे.    कोरोनाबाधित गर्भवती महिला कोरोनामुक्त करणे तसेच तिच्या पासून नवजात बालकाला कुठल्याही प्रकारे संसर्ग होऊ नये याची विशेष खबरदारी या प्रसुतीगृहात घेण्यात येत आहे. कोरोनाबाधित गर्भवतीच्या प्रसुतीनंतर पुढील पाच दिवस ते नवजात बालक आईकडे न देता, ते अन्य नातेवाईकांकडे सुपूर्त केले जाते़ यामुळे स्तनपान करताना शिशूला कोरोना संसर्ग होणार नाही याची खबरदारी येथे घेतली जाते. 

पाच दिवसानंतर त्या शिशूची कोविड-१९ ची तपासणी करण्यात आल्यावर, आत्तापर्यंत १०४ शिशूंना कोरोनाची बाधा झाली नसल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, संबंधित शिशूंना जन्मताच सर्व उपचार देताना, त्यांचे पोषणही व्यवस्थित होईल याकरिता संबंधित शिशूच्या नातेवाईकांना योग्य मार्गदर्शन व सूचना देण्याबरोबरच सातत्याने त्या नवजात बालकाची आरोग्य तपासणी करण्यातही हे प्रसुतीगृह मागे राहिले नाही. परिणामी आजपर्यंत येथे झालेल्या १०८ प्रसुतीपैकी ८५ सिझर व २१ नॉरर्मल प्रसुती झाल्या असल्यातरी, बाळ-बाळंतीन कोरोनामुक्त होऊनच घरी परतले आहेत. --------------- प्रसुतीगृहात १०८ प्रसुती झाल्या असून, केवळ दोन शिशूंनाच कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. परंतु, ही बाधाही शिशूच्या आईकडून नव्हे तर त्याचा सांभाळ करणाऱ्या अन्य नातेवाईकांच्या मार्फतच झाल्याचे दिसून आले आहे. संबंधित नातेवाईक हे कोरोनामुक्त होते, मात्र ते कोविड-१९ विषाणूचे वाहक बनल्याने त्यांचापासूनच ही बाधा शिशूंना झाली. तर इतर प्रसुतीगृहातून दोन बालके येथे कोविड-१९ च्या उपचारासाठी दाखल झाली होती. अशी चारही नवजात बालके अकरा दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आली आहे. मे महिन्यापासून आत्तापर्यंत १०९ प्रसुती सोनावणे प्रसुतीगृहात झाल्या असून, सर्व बाळ बाळंतीन सुखरूप व कोरोनामुक्त असल्याची माहिती प्रसुतीगृहाच्या प्रमुख डॉ. माधुरी रोकडे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ----------------------------

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPregnancyप्रेग्नंसीhospitalहॉस्पिटलWomenमहिला