शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध,‘एल्गार’वर धाडसत्र, नक्षलींशी संबंध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:15 IST

कोरेगाव भीमा प्रकरणात पुणे पोलिसांकडून विनाकारण एल्गार परिषद तसेच कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या दडपशाहीचा कोरेगाव भीमाशौर्य प्रेरणा अभियान समितीच्या वतीने निषेध करण्यात आला.

पुणे : कोरेगाव भीमा प्रकरणात पुणे पोलिसांकडून विनाकारण एल्गार परिषद तसेच कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या दडपशाहीचा कोरेगाव भीमाशौर्य प्रेरणा अभियान समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे व फुले आंबेडकर विद्वत सभेचे अध्यक्ष प्राचार्य म.ना.कांबळे, रिपब्लिकन भारतचे आकाश साबळे, अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे किशोर कांबळे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एल्गार परिषदेत भडकावू भाषणे केल्याने कोरेगाव भीमा येथे दंगल झाल्याचा आरोप ठेऊन विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ याप्रकरणात नक्षलवाद्याचा संबंध असल्याच्या संशयावरुन मंगळवारी पहाटेपासून पुणे, मुंबई आणि नागपूर येथे कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर पोलिसांनी छापे घातले.प्राचार्य म़ ना़ कांबळे म्हणाले, सरकार भेदभाव करीत आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आतापर्यंत पोलिसांनी कोणालाही चौकशीसाठी बोलावले नाही़ कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांना यापूर्वी अटक केली होती़ त्यातून ते जामीनावर सुटले आहेत़ आंबेडकरवादी गटाकडून संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली जात आहे़ त्यावरील लक्ष दुसरीकडे वेधण्यास कबीर कला मंच तसेच आंबेडकरी चळवळतील कार्यकर्त्यांचे नक्षलवाद्यांशी संबंध आहे, हे दाखविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एल्गार परिषद सर्वांसमोर व सर्व परवानग्या घेऊन आयोजित केली होती़ सर्व भाषणांची ध्वनीफित उपलब्ध आहे.नक्षलवाद्यांशी संबंधितांवर एटीएस कारवाई करते. पण ही कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे़ या कारवाईत पोलिसांना काहीही आक्षेपार्ह सापडले नाही़ अशाप्रकारे कार्यकर्त्यांच्या घराची झडती घेतली जात असेल तर डॉ़ नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणात सनातनच्या सहभागाचा आरोप होत आहे. सरकारची हिंमत असेल तर सतातनच्या कार्यकर्त्यांच्या घराची झडती घ्यावी़, असे आव्हान यावेळी देण्यात आले.शनिवारवाडा येथील एल्गार परिषदेत भडकावू भाषणे व गाणी म्हटल्याबद्दल विश्रामबाग पोलीस ठाण्यात कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी पुणे पोलिसांनी ६ ठिकाणी छापे घालून झडती घेतली आहे़ जिग्नेश मेवाणी आणि उमर खालिद यांच्या घरांवर कुठलेही छापे घालण्यात आले नाहीत़-रश्मी शुक्ला, आयुक्त, पुणे पोलीस

टॅग्स :Policeपोलिस