शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांनी केलेला गोळीबार हा संरक्षणासाठी : लेफ्टनंट जनरल देवराज अंबू; चौकशी नंतर निर्णय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 15:16 IST

जम्मु काश्मिर मध्ये सैनिकांच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. लष्करही याबाबत चौकशी करणार आहे. त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल,’’ अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देबॉम्बे सॅपर्सचे १९८व्या वर्धापन दिनानिमित्त संचलनजवानांनी त्यांच्या सरंक्षणासाठी गोळीबार केला : अंबू

पुणे : ‘‘जम्मु काश्मिर मध्ये सैनिकांच्या गोळीबारात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी आहे. हा गोळीबार  सैनिकांनी स्वत: च्या आणि लष्कराच्या संसाधनांच्या रक्षणासाठी केला. या प्रकरणी स्थानिक प्रशासनाने गुन्हा नोंदवला आहे, असे असले तरी लष्करही याबाबत चौकशी करणार आहे. त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल,’’ अशी माहिती लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी पत्रकारांना दिली.बॉम्बे सॅपर्सच्या १९८व्या वर्धापन दिनानिमित्त झालेल्या संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. अंबू म्हणाले, जम्मु काश्मिरमध्ये जवानांवर स्थानिकांचा एक समूह चालून आला. जवानांनी त्यांच्या सरंक्षणासाठी केला. यापुढेही अशी परिस्थिती आल्यास सरकारी मालमत्तेच्या रक्षणासाठी लष्कर असे निर्णय घेईल.सीमेवरील होणारी घुसखोरी आणि गोळीबाराबाबत अंबू म्हणाले, की राजुरी भागात काल पाकिस्तानकडून गोळीबार झाला. गेल्या काही दिवसांत भारतीय सीमेवर गोळीबाराचे प्रमाण वाढले आहे. घुसखोरांना भारतीय सीमेत प्रविष्ठ करण्यासाठी पाकिस्तान कडून या प्रकारची फायरिंग केली जाते. मात्र, भारतीय लष्कर त्याला चोख प्रत्युत्तर देत असून घुसघोरांना धडा शिकवत आहे. सीमेवर भारतीय लष्कराची परिस्थीती भक्कम आहे. कुठल्याही परिस्थितीशी सामोरे जाण्यास लष्कर तयार आहे. 

२०१७ मध्ये २१३ दहशतवाद्यांना कंठस्नान जम्मु काश्मिरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवामुळे मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांवर लष्कराने नियंत्रण मिळवले आहे. घुसखोर असो वा दहशतवाद लष्कर त्यांच्या विरोधात कठार पावले उचलत आहेत. २०१७ मध्ये जवळपास २१३ दहशदवादी मारले गेले आहेत. मोठ्या प्रमाणात त्यांचे नेतृत्व हे सीमेपलिकडून येत आहे. ते स्थानिक युवकांना भडकवण्याचे काम करत आहेत. मात्र, त्यांच्यावरही नियंत्रण मिळवण्यास लष्कराला यश आले आहे.  

टॅग्स :Puneपुणे