शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील मुकुंदनगरमध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; व्यवस्थापकासह ५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 18:59 IST

‘आॅरा थाई स्पा अँड सलून’च्या मुकुंद नगर येथील शाखेत मसाजच्या नावाखाली सुरु असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघड केला.

ठळक मुद्देस्पाच्या व्यवस्थापकासह पाच जणांवर दाखल करण्यात आला गुन्हाथालंडमधील ४ महिलांची सुटका, ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त

पुणे : देशभरात साखळी असलेल्या प्रसिद्ध ‘आॅरा थाई स्पा अँड सलून’च्या मुकुंद नगर येथील शाखेत मसाजच्या नावाखाली सुरु असलेला वेश्याव्यवसाय पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघड केला. स्पाच्या व्यवस्थापकासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार थायलंडच्या महिलांची येथून सुटका करण्यात आली. प्रशांत रमाकांत बोधे (वय ३८, रा. पुण्याई कॉम्पलेक्स, के. के. मार्केट जवळ, धनकवडी), महेश गणेश लांडगे (वय २४, का. धवलगिरी सोसायटी जवळ, मुकुंद नगर), दर्शन नरेन शहा, मलिक कासिफ खान, इद्रीस बद्री (रा. मुंबई) यांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार नितीन तरटे व राजेश उंबरे यांना मुकुंदनगरच्या सुजय गार्डन बिल्डींगमधील आलिशान स्पा मध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाली होती. परदेशी मुलींना नोकरीचे आणि अधिक पैशाचे आमीष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे पोलिसांना समजले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने याची खातरजमा करुन, त्यावर छापा टाकला. येथून थालंडमधील ४ महिलांची सुटका करण्यात आली. तसेच येथून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा ३ लाख १४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यांतर्गत पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, चंद्रकांत जाधव, शीतल भालेकर, नितीन तरटे, कविता नलावडे, गितांजली जाधव, रुपाली चांदगुडे, सरस्वती कागणे, स्वारगेट पोलीस स्टेशनचे निरीक्षक फारुक काझी यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :Puneपुणे