शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

इंधनावरील जीएसटीसाठी राज्यांकडून प्रस्ताव येणे अपेक्षित : शिव प्रताप शुक्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 19:56 IST

देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या प्रचंड दरवाढीत सर्वसामान्य जनता होरपळली जात आहे. त्यामुळे ते जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देराज्यांकडून विचारणा झाल्याशिवाय निर्णय नाही  देशाच्या प्रगतीसाठी नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर येणे गरजेचे

पुणे : पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्यासाठी राज्यांकडून प्रस्ताव आला पाहिजे. त्याशिवाय जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा होऊ शकत नाही. राज्यांनी प्रस्ताव दिल्यास त्यावर त्वरित निर्णय घेऊ असे सांगत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी शुक्रवारी (२५ मे) सांगितले. सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरच्या (एमसीसीआयए) सभागृहात आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. एमसीसीआयएचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, महासंचालक अनंत सरदेशमुख, जीएसटीचे प्रधान सचिव ए. के. पांडे, प्रप्तीकर विभागाचे मुख्य आयुक्त विनोदानंद झा या वेळी उपस्थित होते. शुक्ला म्हणाले, इंधन दराच्या भडक्यामुळे पेट्रोल-डिझेलवर देखील जीएसटी लावावा अशी मागणी करण्यात येत आहे. त्यामुळे इंधनाचे दर देशभरात जवळपास एकाच पातळीवर राहतील. तसेच इंधन दरातही घट होईल. मात्र, जोपर्यंत राज्यांकडून प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत त्यावर जीएसटी कौन्सिलमध्ये चर्चा होणार नाही. राज्यांनी प्रस्ताव पाठविल्यास त्यावर त्वरित निर्णय घेतला जाईल. इंधनावर केंद्र सरकारचे फारसे कर नाहीत. त्यात मुख्य वाटा हा राज्य सरकारचा आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयावरच इंधनावरील जीएसटीचा निर्णय अवलंबून असेल.  मध्यंतरी देशात नोटतुटवडा झाल्याची स्थिती होती. त्याबाबत बोलताना शुक्ला म्हणाले, नोटटंचाईची कोणतीही स्थिती नाही. तसेच २ हजारांची नोट बंद करण्याचा देखील कोणताही विचार नाही. मध्यंतरी पाचशे रुपयांच्या नोटा बाजारात अधिक येत होत्या. नोटबंदीकाळात रिझर्व्ह बँकेकडे जमा झालेल्या नोटांची मोजणी अजूनही सुरु असल्याचे सांगत त्यांनी नोटबंदी काळात जमा झालेल्या नोटांवर अधिक बोलण्याचे टाळले. ---------------------तर, जीएसटी ८ लाख कोटींवर जाईलवस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी सिंगापूरसारख्या छोट्या देशाला देखील पाच वर्षे लागली. आल्या देशात एक वर्षाच्या आत नवीन करप्रणाली चांगल्या पद्धतीने लागू केली. सध्या १ लाख कोटींवर कर पोहोचला असला, तरी अगामी काही वर्षांत तो ७ ते आठ लाखांवर जाऊ शकतो. सर्व नागरिकांनी ही प्रणाली आपलीशी केली, तर हे शक्य असल्याचे शिव प्रताप शुक्ला म्हणाले. -------------------मोदींचा सूर्य पुन्हा उगविण्यासाठीआम्ही चुकीचे वागलो, तर आमच्या जागी अन्य कोणी येईल. मात्र, देशाच्या प्रगतीसाठी नरेंद्र मोदी पुन्हा येणे गरजेचे आहे. देशातील जनतेची देखील मोदी हेच पसंती आहेत. गुजरातवरुन एकेकाळी मोदींना खलनायक ठरविण्यात आले आहेत. आज ते विश्ववंदनीय ठरले आहेत. त्यामुळे अगामी निवडणुकीत मोदींचा सूर्य अस्तासाठी नव्हे, तर पुन्हा उगविणार असल्याचे सांगून केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी मोदींना साथ देण्याचे आवाहन उद्योजकांना केले.

टॅग्स :PuneपुणेShiv Pratap Shuklaशिव प्रताप शूक्ला