शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

येरवड्यात २२ कोर्ट हॉलची इमारत उभारण्याचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 20:47 IST

येरवडा येथे न्यायालयाची नवीन इमारात उभारण्यासाठी नुकतीच एक एकर जागा देखील मंजूर करण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रशस्त तीन मजल्यांची बिल्डींग, आणखी एक एकर जागा देण्याची न्यायालय प्रशासनाची मागणी पुढील ५० वर्षांचा विचार करून न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या बाबी उभारण्यावर भर देण्यात येणारमहत्वाच्या खटल्यांमधील आरोपींना देण्यात येणा-या सुरक्षेत देखील घट करता येणे शक्य होणार बराकीच्या ठिकाणीही १५ हजार चौरस मीटर बांधकाम शक्य

पुणे : येरवडा येथे न्यायालयाची नवीन इमारात उभारण्यासाठी नुकतीच एक एकर जागा देखील मंजूर करण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणी आणखी एक एकर जागा देण्याची मागणी न्यायालय प्रशासनाकडून करण्यात आली असून त्यावर २२ कोर्ट हॉलची तीन मजली प्रशस्त इमारत उभाण्याचा प्रस्ताव आहे.     शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात असलेले प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कार्ट येरवडा येथे हलविण्यात यावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यानुसार जिल्हा न्यायालयाच्या विस्ताराकरीता येरवडा येथे एक एकर जागा देण्याचा आदेश जुलै महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाने काढला आहे.  विस्तारासाठी जागा मिळण्याबाबत जिल्हा न्यायाधीश व अतिरीक्त सत्र न्यायाधीश यांनी २०१७ मध्ये अर्ज केला होता. त्यात येरवडा आणि शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयातील जागांची मागणी करण्यात आली होती. त्याबाबत तहसीलदार यांनी चौकशी आहवाल सादर केला. त्यात येरवडा येथील जागेच्या सातबारा उताºयावर कब्जेदार सदरी सरकार अशी नोंद असून ती न्यायायलयाच्या विस्तारासाठी देण्यास देण्यास हरकत नसल्याचे कळविले होते. याप्रकरणी विधी व न्याय विभाग, नगर विकास विभाग, वित्त विभाग यांनी दिलेल्या अभिप्रार्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल संहितानुसार पुणे जिल्हा न्यायालयाच्या विस्ताराकरीता येरवडा येथील एक एकर जागा विधी व न्याय विभागास विनामुल्य देण्यास हरकत नसल्याचे कळविले. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी विनामुल्य व कब्जेहक्काने येरवडा येथील जागा विधी व न्याय विभाग (जिल्हा न्यायालय पुणे) यांना देण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र, त्याठिकाणी बांधकामासाठी १ एफएसआय मंजूर आहे. त्यामुळे मंजूर जागेत केवळ १२ कोर्ट हॉलचे बांधकाम करता येवू शकते. त्यामुळे याच जागेला लागून आणखी एक एकर जागा देण्यात यावी, अशी मागणी न्यायालय प्रशासनाकडून करण्यात आली आहे. एकूण दोन एकर जागा मिळाल्यास येरवड्यात २२ कोर्ट हॉल असलेली तीन मजल्यांची प्रशस्त इमारत उभारण्यात येणार आहे.      येरवड्यातील जागेत पुढील ५० वर्षांचा विचार करून न्यायालयासाठी आवश्यक असलेल्या बाबी उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. पुरेसे पार्किंग, कॅन्टीन, चांगली स्वच्छतागृहे, सीसीटीव्ही आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशी सोय अशा बाबी याठिकाणी पुरविण्यात येणार आहेत. इमारत बांधून पुर्ण झाल्यानंतर सत्र न्यायालयातील सर्व प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी कोर्ट नवीन ठिकाणी हलविण्यात येणार आहे. त्यामुळे येरवडा कारागृहातील आरोपींना न्यायालयात हजर करणे सोपे होणार आहे. तसेच महत्वाच्या खटल्यांमधील आरोपींना देण्यात येणा-या सुरक्षेत देखील घट करता येणे शक्य होणार आहे. ...............बराकीच्या ठिकाणीही १५ हजार चौरस मीटर बांधकाम शक्यन्यायालयातील पोलीस चौकी ते पुणे बार असोसिएशनच्या कॅन्टीनपर्यंतच्या जागेत नवीन इमारत उभारण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि न्यायालय प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली आहे. सर्व परवानण्यांची पुर्तता झाल्यानंतर या जागेवरील बराकी पाडून त्याठिकाणी महानगरपालिकेच्या १.५ एफएसआय नियमानुसार १५ हजार १२० चौरस मीटर बांधकाम करता येऊ शकते. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयYerwadaयेरवडा