शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

फरार माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेची मालमत्ता आज होणार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 09:41 IST

हवेली तहसीलदार व पुणे शहर तहसीलदार करणार जप्तीची कारवाई

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता  आणि फरार घोषित केलेल्या रवींद्र बऱ्हाटे याच्या मालमत्तेच्या जप्तीचे आदेश न्यायालयाने दिले होते़ जिल्हाधिकार्‍यांमार्फत आज बुधवारी बर्‍हाटे यांची मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हवेली तहसीलदार व पुणे शहर तहसीलदार आज सकाळी १० ते १२ च्या दरम्यान जप्तीची कारवाई करणार आहेत. रवींद्र बर्‍हाटे यांच्या मालमत्तेपैकी कोंढवा येथील लुल्लानगरमधील मधुसुधा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅट, धनकवडी येथील तळजाई पठारमधील सरगम सोसायटीमधील एका प्लॉटवरील बंगला, तसेच याच सरगम सोसायटीमधील मोकळा प्लॉट आणि कात्रज भागातील भागीदारीमधील जमीन अशा ५ मालमत्ता जप्त करण्यात येणार आहे. बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांना धमकावुन खंडणी वसुल केल्याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात रवींद्र लक्ष्मण बर्‍हाटे, दिप्ती आहेर, शैलेश जगताप, देवेंद्र जैन व अमोल चव्हाण यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील इतर आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, रवींद्र बर्‍हाटे हा तेव्हापासून फरार झाला आहे. या प्रकरणात एकूण ८ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बर्‍हाटे व त्याच्या टोळीविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यात जमीन व्यवहारावरुन फसवणूक करणे, खंडणी मागणे, पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावणे अशा विविध कलमाखाली अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.बर्‍हाटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतरही पोलिसांना तो सापडू शकला नाही. त्यामुळे न्यायालयाने त्याला फरारी घोषित करुन मालमत्ता सीआरपीसी ८३ प्रमाणे जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आज होणार आहे.