शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक न्यायालयातील पार्किंगचे उद्घाटन पुन्हा लांबणीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 16:18 IST

भाड्याची रक्कम ठरल्यास अगदी दुस-या दिवशी देखील पार्किंग खुले करता येवू शकते..

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम खात्याने मागितले दरमहा ५ लाख ६० हजार रुपये भाडे १६ महिन्यांपासून पार्किंगचा वापर नाही 

पुणे: वाहने पार्क करण्यासाठी जागा नसल्याने न्यायालयाच्या इमारतीला वळसा घालायला लागत असल्याची परिस्थिती कौटुंबिक आणि जिल्हा न्यायालयात आहे. असे असतानाही कौटुंबिक न्यायालयातील दोन मजली पार्किंग गेल्या १६ महिन्यांपासून बंद आहे. तर पार्किंग पे अँड पार्क तत्वावर सुरू करण्यासाठी दरमहा ५ लाख ६० हजार रुपये भाडे देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनकडे (एफसीएलए) केली आहे. मात्र तेवढे भाडे देणे शक्य नसल्याने अजून काही महिने तरी हा प्रश्न मार्गी लागणार नसल्याचे चिन्हे आहेत.     सीसीटीव्ही कॅमेरे आणि वाहने पार्क करण्यासाठी आवश्यक असलेले मार्क येथील पार्किंगमध्ये आखण्यात आले आहे. भाड्याची रक्कम ठरल्यास अगदी दुस-या दिवशी देखील पार्किंग खुले करता येवू शकते. मात्र, आधी पार्किंग मोफत ठेवायचे की सशुल्क व आता भाड्याबाबत एकमत न झाल्याने पार्किंगची प्रशस्त जागा विनावापर आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१८ मध्ये एफसीएलएला पे अँड पार्क सुरू करण्याची जबाबदारी दिली होती. तर या ठिकाणी किती भाडे अकारण्यात यावे हे ठरविण्याचे अधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले आहे. त्यानुसार विभागाने काही दिवसांपुर्वी एफसीएलएला पत्र पाठवले असून पे अँड पार्क  पार्किंग सुरू करण्यासाठी दरमहा ५ लाख ६० हजार रुपये भाडे द्यावे लागेल, अशी मागणी करण्यात आली आहे.  कौटुंबिक न्यायालयात येणा-या पक्षकारांच्या वाहन पार्किंगमधून एवढी रक्कम मिळणे शक्य होणार नाही. त्यामुळे विभागाने केलेली मागणी अवास्तव असल्याचे असल्याचे स्पष्ट करीत भाड्याची रक्कम कमी करावी, अशी मागणी एफसीएलएने केली आहे. फॅमिली कोर्ट अ‍ॅडव्होकेटस असोसिएसशनकडून पे अँड पार्कच्या निर्णयाला सुरुवातीपासून विरोध दर्शविण्यात येतो आहे. तसेच मोफत पार्किंग देण्याची मागणी करण्यात येते आहे. ..................पार्किंगची जबाबदारी आमच्या संघटनेला देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी दरमहा ५ लाख ६० हजार रुपये भाडे देणे परवडणारे नाही. त्यामुळे मोफत पार्किंग सुरू करण्यात यावे किंवा पे अँड पार्क करायचे असेल तर भाड्याची रक्कम कमी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आले आहेय अ‍ॅड. वैशाली चांदणे, अध्यक्षा, दि पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयParkingपार्किंग