शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
2
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
3
हेमंत सोरेन यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 13 मे रोजी होणार!
4
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
5
“मोदींनी मान्य करावे की आता सत्तेत येत नाहीत”; पवार, ठाकरेंच्या ऑफरवर नाना पटोले थेट बोलले
6
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
7
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
8
नरहरी झिरवळ शरद पवार गटाच्या वाटेवर, चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी महायुतीला मोठा धक्का
9
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
10
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
11
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
12
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!
13
Gold Silver Price: गेल्या अक्षय तृतीयेला घेतलेल्या सोन्याची किंमत किती झाली माहितीये? दरात झालीये मोठी वाढ
14
'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकच्या लग्नाची बातमी खोटी? जवळचा मित्र शिव ठाकरे म्हणाला...
15
“नरेंद्र मोदी लटकता आत्मा, आमचे पवित्र आत्मे त्यांच्यासोबत जाणार नाही”; संजय राऊतांचा पलटवार
16
Akshaya Tritiya 2024: सुखाचा व धनाचा कधीही होणार नाही क्षय; अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' मूर्ती!
17
"यूपीत इंडिया आघाडीचे वादळ, नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत", राहुल गांधींचा हल्लाबोल
18
देशातील पहिला डिजिटल भिकारी राजूचे Heart Attack ने निधन, QR कोडद्वारे मागायचा भीक
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : "निलेश लंके तू किस झाड की पत्ती है..." अजित पवार यांचा इशारा
20
काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा शिंदे, अजितदादांसोबत या; PM मोदींची उद्धव ठाकरे, शरद पवारांना खुली 'ऑफर'

कोरेगाव भीमा हिंसाचाराची साक्ष आॅक्टोबरमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 2:48 AM

काही संस्था वा व्यक्तींना काही माहिती द्यायची असल्यास त्यांनी आयोगाकडे ३ सप्टेंबरपर्यंत लेखी कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे : कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोग पुण्यामध्ये येत्या ३ ते ६ आॅक्टोबर रोजी साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेणार आहे. काही संस्था वा व्यक्तींना काही माहिती द्यायची असल्यास त्यांनी आयोगाकडे ३ सप्टेंबरपर्यंत लेखी कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ ला झालेल्या हिंसाचार प्रकरणी कोरेगाव भीमा चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. यापूर्वी आयोगाने ११ ते १५ मे रोजी शपथपत्राच्या स्वरूपात निवेदने मागविली होती. आयोगानेदेखील कोरेगाव भीमा, पेरणेफाटा, वढू बुद्रुक, सणसवाडी येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला होता. नागरिक, पोलीस आणि प्रशासनाकडून अनेक अर्जदेखील झाले आहेत. तसेच, संबंधित चौकशी आणि साक्ष नोंदविण्याचे काम आॅक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे जाहीर करण्यात आले होते.त्या पार्श्वभूमीवर ५ ते ७ सप्टेंबर रोजी आयोगाच्या मुंबई कार्यालयात आणि ३ ते ६ आॅक्टोबर रोजी पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेच्या इमारतीतील कार्यालयात होणार आहे. संबंधीत साक्षीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच सुरुवातीस ज्या साक्षीदारांना बोलावण्यात आले आहे, त्यांची नावे आणि सुनावणीची तारीख आयोगाच्या कार्यालयात उपलब्ध आहे.या शिवाय ज्यांनी आयोगाकडे निवेदने दाखल केली आहेत, त्या संस्था, संघटना अथवा व्यक्तींना सुनावणीला उपस्थित राहता येईल. त्यासाठी त्यांना आयोगाच्या माहिती आयुक्त कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन, मादाम कामा रस्ता, मुंबई येथील कार्यालयाकडे येत्या ३ सप्टेंबरपर्यंत लेखी कळवावे लागेल.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगाव