शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी १५ लाख, सिंचनापोटीचे १९१ कोटी रुपये केले माफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 01:09 IST

शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठ्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा असलेला भामा-आसखेड प्रकल्प मार्गी लागणार आहे.

पुणे : शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठ्यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा असलेला भामा-आसखेड प्रकल्प मार्गी लागणार आहे. राज्य शासनाने शुक्रवारी झालेल्या बैठकीमध्ये यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला. या प्रकल्पांतर्गत असलेल्या सिंचनापोटीचे १९१ कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. त्याच्या बदल्यात बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी १५ लाख रुपये देण्याचा निर्णय शासनाने महापालिकेला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पालिकेकडून ३५0 प्रकल्पबाधितांना १३0 कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे.भामा-आसखेडचा प्रश्न मागील काही वर्षांपासून प्रलंबित पडला होता. प्रकल्पबाधितांच्या मोबदल्याचा प्रश्न कळीचा मुद्दा बनला होता. शासनाने घेतलेल्या आदेशामुळे महापालिका आणि पूर्व भागातील नागरिकांना दिलासा मिळाला असून, प्रकल्पाचे काम मार्गी लागण्यासाठी त्याची मदत मिळणार आहे. त्यामुळे या भागातील पाणीप्रश्न सुटण्यास मदत मिळणार आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पुणे शहराला पाणीपुरवठा करणाºया जॅकवेल व जलवाहिनीचे काम गुरुवारी (दि.७) दुपारी बंद पाडले होते. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नाबाबत शासनाकडून कुठलाही ठोस निर्णय घेण्यात येत नसून, भविष्यातही मागण्या मान्य होणार नसल्याचे लक्षात आल्याचा आरोप करीत बाधितांनी हे काम बंद पाडण्याचा निर्णय घेतला होता. या वेळी बळजबरी केली तर जलसमाधी घेण्याचा इशाराही देण्यात आलेला होता. भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असणाºया मागण्या मान्य होत नसल्याचे चित्र दिसत असल्याने प्रकल्पग्रस्त नागरिकांनी गुरुवारी करंजविहिरे येथे बैठक घेत काम बंद करण्याची भूमिका घेतली होती. प्रकल्पाची पाचवी मुदत उलटून गेली आहे. या प्रकल्पांतर्गत (सिंचन) महापालिकेने शासनाला १९१ कोटी रुपये देणे अपेक्षित आहे. ही रक्कम भरण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या होत्या. मात्र, शेतकºयांनी आक्रमक भूमिका घेत मोबदला द्या; अन्यथा काम बंद पाडू, अशी भूमिका घेतली. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये पालिकेचा सिंचनाचा निधी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्या बदल्यात शेतकºयांना हेक्टरी १५ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.>मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैैठक : महापालिका मोबदला देणारमंत्रालयामध्ये शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीला जलसंपदा विभाग, पुनर्वसन विभाग, नगरविकास विभाग, वित्त विभाग या सर्व विभागांचे प्रधान सचिव, अन्य अधिकारी तसेच पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. प्रकल्पबाधितांना पुनर्वसनासाठीची रक्कम मोबदला पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भरावयाची आहे. दोन्ही महापालिकांना ज्या प्रमाणात पाण्याचा कोटा मिळणार आहे, त्या प्रमाणात रोख रकमेचा वाटा जमा करावा लागणार आहे. त्याला बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. दोन्ही महापालिकांच्या मोबदल्याच्या बदल्यात पाटबंधारे खात्याकडे सिंचन पुनर्स्थापना खर्चास शासनाने माफी दिली आहे. तब्बल ४०० प्रकल्पबाधित शेतकºयांनी हेक्टरी १५ लाख रुपये मोबदला घेण्यास लेखी संमती दिली आहे.>सिंचनाचा निधी माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र, या बदल्यात प्रकल्पबाधितांना हेक्टरी १५ लाख रुपयांचा मोबदला देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेला १३० कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. पालिकेकडे हा निधी उपलब्ध असून भामा-आसखेडचे काम आता लवकरच मार्गी लागेल.- प्रवीण गेडाम,अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा