शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

भावजयांची दूध व्यवसायातून प्रगती

By admin | Updated: February 23, 2017 02:09 IST

वळे येथील महिला शेतकरी शारदा ज्ञानेश्वर शिवले, सुरेखा भानुदास शिवले, सुवर्णा अरुण शिवले या

तुषार मोढवे / चासकमानवळे येथील महिला शेतकरी शारदा ज्ञानेश्वर शिवले, सुरेखा भानुदास शिवले, सुवर्णा अरुण शिवले या भावजयांनी एकत्र कुटुंबाच्या माध्यमातून दूध व्यवसाय यशस्वी केला आहे. उस व काही नगदी पिके सोडली तर इतर पिकांचे बाजारभाव सतत कोसळत आहे. या बाजारभावाची टांगती तलवार शेतकऱ्यांवर नेहमीच असते. वर्षातून एखादे पीक घेतले, तर मालाला बाजारभाव मिळेलच असे नाही. त्यामुळे किवळे येथील ज्ञानेश्वर शिवले परिवाराने शेतीला दूध व्यवसायाची जोड दिली आहे. जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची विविध पिके ते घेत आसतात, त्यांच्या शेतात मका, बाजरी, कडबा, गवत आदी पिके घेतली जातात. या पिकांचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी होतो. घरच्याच शेतात चारा उपलब्ध होत असल्यामुळे चाऱ्यासाठी होणारा खर्च करावा लागत नाही. शिवले यांनी शेतात २८ फूट रुंद ५० फूट लांब आकाराचा गोठा तयार केला आहे. गोठ्यातील सर्व जनावरांना शेतातील मका गवत कुटी मशिनद्वारे करून दिवसातून दोन वेळेस दिले जाते. तसेच पेड भुसा खुराक म्हणून दिला जातो. यामुळे दुधाला चांगला फॅट मिळतो. हे दूध मानवी शरीराला पोषक असते. खुराकामुळे गायींचे आरोग्य तंदुरुस्त राहाते. तसेच गायीची देखभाल व स्वच्छता राखण्यासाठी घरातील सर्वांचे सहकार्य लाभते. गार्इंची वेळच्या वेळी वैद्यकीय तपासणी करून औषधोपचार केले जातात. त्यामुळे त्याचे आरोग्य चांगले राहाण्यास मदत होते. गायीपासून दर्जेदार शेणखत तयार होते. तयार झालेले शेणखत स्वत:च्या शेतात टाकून शेतीची उत्पादकता वाढविली जाते. शेणखतामुळे शेतीचा पोत सुधारतो उरलेले शेण विकले जाते. स्पर्धेच्या युगात तरुणांनी स्वयंरोजगारातून स्वावलंबी बनण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवले यांनी चिकाटीने केलेला दूध व्यवसाय इतर युवकांनाही प्रेरणादायी ठरत आहे.