कोरोनाच्या काळातील प्रभाग क्रमांक बावीस मधील प्रलंबित असलेली कामे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्या पुढाकाराने व माजी नगराध्यक्षा पूजा कड- चांदेरे यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेल्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोथान अभियान अंतर्गत श्रीराम सोसायटी ते शुभम कॉम्प्लेक्स अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व सर्वसाधारण रस्ता अनुदान अंतर्गत चकरेश्वर रोड ते कांची इंक्लेव रस्ता डांबरीकरण करणे अशा ३४ लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर,स्वर्गीय आमदार सुरेश गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, माजी नगराध्यक्षा पूजा कड-चांदेरे, साहेबराव कड, उपजिल्हाप्रमुख शिवाजी वर्पे, तालुकाप्रमुख रामदास धनवटे, अशोक खांडेभराड, प्रकाश वाडेकर, गणेश आरगडे, सयाजी गांडेकर, किरण गवारे, प्रकाश गोरे, विजय शिंदे, राजेंद्र खेडकर, अभिजित जाधव, धनंजय पानसरे, अजय मनसुक आदी उपस्थित होते.
फोटो - चाकण येथील श्रीराम नगरमधील विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी मान्यवर.