शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे न्यायालयातील ज्युनियर वकिलांना अन्नधान्य कीट वाटपात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 16:06 IST

कोरोनामुळे अनेकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्याला न्यायालयात प्रॅक्टिस करणारे तरुण वकील ही अपवाद राहिलेले नाहीत.

ठळक मुद्देतरुण वकिलांसाठी पुणे बार असोसिएशनतर्फे मदतीचा हात एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य आणि किराणा असलेले कीट

पुणे : लॉकडाऊनच्या नियमांची गेल्या दोन दिवसापासून कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याचा फटका मात्र ज्युनियर वकिलांना अन्नधान्य कीटचे वाटप करताना बसला आहे. न्यायालयातील ५२५ ज्युनियर वकिलांनी या कीटसाठी बार असोसिएशनकेडे संपर्क केला आहे. मात्र , सध्या फक्त ३०० ते ३५० जणांना या किटचे वाटप करण्यात आले असून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उर्वरीत १५० ते १७५ जणांना किटचे वाटत करण्यात येणार असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक यांनी सांगितले. लॉकडाऊन कडक केल्यामुळे ज्युनिअर वकिलांना अन्नधान्य आणि किराणाच्या कीट वाटण्यास अडचण निर्माण झाली आहे. यासाठी बाहेर पडलेल्या वकिलांना पोलिसांनी माघारी घरी पाठविले. आतापर्यंत सुमारे ३५० वकिलांना किटचे वाटप करण्यात आले असून, लॉंकडाऊन शिथिल झाल्यानंतर उर्वरीत जणांना किटचे वाटत करण्यात येणार असल्याचे पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतीश मुळीक यांनी सांगितले.देशात कोरोनाचा संसर्ग होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लॉकडाऊन पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालये बंद आहेत. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत केवळ महत्त्वाच्या प्रकरणात सुनावणी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे बारचे अध्यक्ष मुळीक, उपाध्यक्ष  योगेश तुपे, सचिन हिंगणेकर, सचिव घनश्याम दराडे, विकास बाबर, खजिनदार भाग्यश्री गुजर-मुळे, हिशोब तपासणीस ओमकार चव्हाण यांच्याकडून  या योजनेतंर्गत पाच वर्षांपेक्षा कमी प्रॅक्?टीस असलेल्या वकिलांना अन्नधान्य आणि किराणा देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी अध्यक्ष मुळीक यांनी दोन लाख रुपये दिले असून, इतर सिनिअर वकिलांनीही मोठी मदत केली आहे. मुळातच ज्युनिअर वकिलांना काम कमी असते.कोरोनामुळे अनेकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्याला न्यायालयात प्रॅक्टिस करणारे तरुण वकील ही अपवाद राहिलेले नाहीत. अशा तरुण वकिलांसाठी पुणे बार असोसिएशनतर्फे मदतीचा हात देण्यात आला आहे. असोसिएशनतर्फे एक महिना पुरेल एवढे अन्नधान्य आणि किराणा असलेले कीट देण्यात येत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस