शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कँटोन्मेंटच्या उपाध्यक्षपदी प्रियांका श्रीगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 13:10 IST

पुणे कँटोन्मेंट बोर्डाची जानेवारी २०१५ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला उपाध्यक्षपद भूषवता यावे यासाठी पक्षाने रोटेशन पध्दत सुरू केली.

ठळक मुद्देअतुल गायकवाड यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी उपाध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा बोर्डाच्या अध्यक्षपदी ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी पदसिद्ध अध्यक्ष तर उपाध्यक्षपद लोकप्रतिनिधींमधून नियुक्त

पुणे : पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी प्रियांका श्रीगिरी यांची निवड आज सर्वसाधारण सभेत करण्यात आली. पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष राजीव सेठी यांनी घोषणा केली. अतुल गायकवाड यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी उपाध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला होता. आज ते १० एप्रिल रोजी उपाध्यक्ष पदावरून पायउतार झाले. गायकवाड यांच्या अगोदर भाजपच्या नगरसेवक किरण मंत्री आणि दिलीप गिरमकर यांनी बोर्डाचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. त्यामुळे उर्वरित सदस्य विवेक यादव आणि प्रियांका श्रीगिरी या दोघांपैकी कोणाच्या गळयात माळ पडते, त्याची उत्सुकता होती. या पदासाठी दोघांकडून वरिष्ठ नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यात येत होती. बोर्डाच्या अध्यक्षपदी ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी पदसिद्ध अध्यक्ष असतो. तर उपाध्यक्षपद लोकप्रतिनिधींमधून नियुक्त करण्यात येते.दरम्यान,  पुणे कँटोन्मेंट बोर्डाची जानेवारी २०१५ मध्ये निवडणूक झाली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला उपाध्यक्षपद भूषवता यावे यासाठी पक्षाने रोटेशन पध्दत सुरू केली. त्यानुसार मार्च २०१५ मध्ये नगरसेविका डॉ. किरण मंत्री यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती. त्यांनी मार्च २०१६ मध्ये राजीनामा दिला. त्यानंतर १५ मार्च २०१६ रोजी गिरमकर यांच्याकडे हे पद आले. तसेच  गिरमकर यांना एक वर्ष झाल्यावर १६ मार्च २०१७ रोजी त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर १० एप्रिल २०१७ रोजी अतुल गायकवाड यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. आपली मुदत संपल्यावर गायकवाड यांनी राजीनामा दिला असून, तसे पत्र बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर राजीव सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांना दिले होते. राजीनामा पत्राची प्रत शहर भाजपचे अध्यक्ष योगेश गोगावले, राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडेही दिली होती. दरम्यान, सोमवारी झालेल्या बैठकीत प्रियांका श्रीगिरी यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.  

टॅग्स :Puneपुणे