शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सातारा रस्त्याला खासगी वाहतुकीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 02:44 IST

स्वारगेट ते कात्रज : सहा किलोमीटरच्या पट्ट्यात अतिक्रमणे, बीआरटीमुळे अरुंद झाला रस्ता

धनकवडी : प्रचंड प्रवासी वाहतूकसंख्या असणाऱ्या सातारा रस्त्यावर बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणारी वाहने आणि ट्रॅव्हल बसेस, कंपनीच्या बसेस स्कूलबस, सिक्स सीटर यांना थांबण्यासाठी निश्चित असे ठिकाण नसल्यामुळे संपूर्ण सातारा रस्ता दुतर्फा अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. यावर महापालिकेचा वाहतूक नियोजन विभाग, वाहतूक पोलीस यांचे होणारे दुर्लक्ष सर्वसामान्यांना धोकादायक ठरते आहे.

स्वारगेट ते कात्रज सहा किलोमीटर अंतरावर पंचमी चौक, पुष्पमंगल चौक, नातूबाग, पद्मावती, बालाजीनगर, भारती विद्यापीठ, मोरे बाग व कात्रज असे सहा बस थांबे दुतर्फा आहेत. या बस थांब्यावर बस थांबताना, तसेच बीआरटी मार्गाचे काम चालू असल्याने या मार्गातून खासगी वाहने जात असल्याने वाहतूककोंडीबरोबरच अपघातजन्य परिस्थिती वारंवार निर्माण होत आहे. सातारा रस्त्यावर दर दहा मिनिटाला ही परिस्थिती निर्माण होत आहे. खासगी वाहनचालक यांच्यावर कोणाचाही धाक नसल्याने त्यांची अरेरावी वाढली आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रवासी घेणे हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवणारे हे खासगी वाहतूकदार सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळत आहेत. अपघात होईल, मागील गाडी अचानक येऊन धडकेल, याची आजिबात पर्वा केली जात नाही.

पुणे - सातारा रस्ता, कात्रज कोंढवा बाह्यवळण महामार्ग, कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्ग या मार्गावर दिवसभर खासगी लक्झरी बसेसची वर्दळ असते. या बस प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावर कोठेही बेकायदा थांबे घेतात. यामुळे वाहतूककोंडी होते. व्होल्गा चौक, पद्मावती, कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्ग या ठिकाणाहून खासगी वाहतूकदारांच्या गाड्या सुटताना प्रचंड वाहतूककोंडी निर्माण होते. कात्रज चौकात शिरवळ, नसरापूर, भोर, सांगली, सातारा, कोल्हापूर-मिरज, कर्नाटककडे जाणारे दुधाचे टँकर, खासगी कंपनीच्या गाड्या, लक्झरी बस, जीप प्रवासी घेण्यासाठी रस्त्यावरच थांबल्यामुळे वाहतुकीला अडथळा ठरू लागले आहेत. रुंदीकरणानंतर जागेत अतिक्रमणे झाली आहेत.खासगी वाहतुकीचे दर : सणासुदीला प्रवाशांची लूट४जोडून येणाºया सुट्या आणि सणासुदीच्या काळात नोकरीनिमित्ताने शहरात राहणाºया नागरिकांचे गावी जाण्याचे प्रमाण अधिक असते. उपलब्ध गाड्या आणि प्रवासीसंख्या यांच्या व्यस्त प्रमाणाचा फायदा घेऊन खासगी वाहतूकदार प्रवाशांची अडवणूक करून जादा दराची मागणी करतात. वास्तविक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तिकिटाच्या तुलनेत कमाल दीडपट वाढीव दर आकारण्याची परवानगी खासगी वाहतूकदारांना देण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी खासगी वाहतूकदार एसटीच्या तिकीट दराच्या तुलनेत दुप्पट - तिप्पट अधिक दर आकारत राज्य सरकारचा नियम धाब्यावर बसवून प्रवाशांची लूट करीत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेroad safetyरस्ते सुरक्षाTrafficवाहतूक कोंडी