शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

खासगी संस्थेवर पालिकेची मेहेरनजर, निराधार मुलांना निवारा, शाळांच्या रिकाम्या इमारती देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 03:38 IST

एकीकडे महापालिकेच्या शाळांचे विलिनीकरण करतानाच शाळांच्या रिकाम्या इमारती एका खासगी संस्थेला निवारा या केंद्र सरकारच्या प्रकल्पांतर्गत देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. प्रशासनाने हा प्रस्ताव समितीसमोर ठेवला होता.

पुणे - एकीकडे महापालिकेच्या शाळांचे विलिनीकरण करतानाच शाळांच्या रिकाम्या इमारती एका खासगी संस्थेला निवारा या केंद्र सरकारच्या प्रकल्पांतर्गत देण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली. प्रशासनाने हा प्रस्ताव समितीसमोर ठेवला होता.या इमारती महापालिका हैदराबादस्थित त्या संस्थेला दुरुस्त करून तसेच पायाभूत सुविधा निर्माण करून देणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकातील १० कोटी रुपयांच्या तरतुदीचा वापर करण्यात येणार आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. संबंधित संस्थेने पुणे शहराचे काही महिन्यांपूर्वी सर्वेक्षण केले. त्याच्या अहवालात संपूर्ण शहरात १० हजारपेक्षा जास्त मुले निराधार, निवारा नसलेली सापडली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.महापालिकेच्याच नागरवस्ती विकास विभागाने दोन वर्षांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरात साधारण १ हजारच्या आसपास मुले अशी निवारा नसलेली आढळली होती. अशा मुलांसाठी व प्रौढांसाठीही महापालिकेचा घरटं हा प्रकल्प आहे. त्यासाठी महापालिका दरवर्षी खर्च करत असते. शहराच्या तीन भागांत हा प्रकल्प महापालिकेच्याच वतीने चालवण्यात येतो. तरीही आता हैदराबाद येथील त्या संस्थेसाठी म्हणून केंद्र सरकारच्या निवारा प्रकल्पाचा वापर केला जात आहे.या संस्थेनेच सर्वेक्षण केले व आता त्यांनाच मुलांच्या निवाºयासाठी म्हणून शाळांच्या रिकाम्या इमारती फक्त उपलब्धच करून दिल्या जात नाहीत तर दुरुस्तही करून दिल्या जात आहेत. त्यासाठीचा सर्व खर्च महापालिका करणार आहे. संबंधित संस्था सीएसआर अंतर्गत (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) या मुलांचे शिक्षण तसेच अन्य आवश्यक खर्च करणार आहे. तसा करारच आता स्थायी समितीच्या मान्यतेमुळे महापालिका व संस्थेमध्ये होईल.शहरात अशा अनेक सेवाभावी संस्था असतानाही त्यांच्याशी संपर्क करण्याचे सोडून हैदराबाद येथील संस्थेला यात सामावून घेण्याचे कारण काय, असे विचारले असता मोहोळ यांनी अशा संस्थांनीही महापालिकेबरोबर संपर्क साधावा, आम्ही त्यांनाही यात सामावून घेऊ शकतो, असे सांगितले. निराधार, मुलांचे शिक्षण व्हावे, त्यांची देखभाल व्हावी या हेतूने महापालिका हा प्रकल्प राबवत आहे, त्या संस्थेचे काही चुकत असल्यास त्यांना बाजूला केले जाईल, असे मोहोळ म्हणाले.दरम्यान, स्थायी समितीच्या सभेत महापालिकेच्या तब्बल १८ शाळांचे विलिनीकरण पटसंख्या कमी असल्याचे कारण दाखवून करण्यात आले. यात १७ शाळा मराठी माध्यमाच्या तर १ शाळा इंग्रजी माध्यमाची आहे. शिक्षकांची संख्या कमी आहे व या शाळांचे विलिनीकरण केल्यामुळे आता काही शिक्षक उपलब्ध होती, त्यांना शिक्षक कमी असलेल्या शाळांवर पाठवले जाईल. विलिनीकरण केलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही त्याच इमारतीमधील दुसºया शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असे ते म्हणाले.कात्रज येथील महापालिकेच्या मालकीचा एक भूखंड महावीर प्रतिष्ठान या संस्थेला शाळेसाठी म्हणून ३० वर्षांच्या कराराने देण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.वार्षिक २७ लाख २७ हजार या दराने व दरवर्षी १२ टक्के भाडेवाढ करून हा भूखंड देण्यास मान्यता देण्यात आली.संस्थेने त्यावर इमारत बांधायची आहे व ३० वर्षांनंतर त्यांना पुढे करार करणे नको असेल तर इमारतीसह जागा पालिकेच्या ताब्यात द्यायची आहे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे