शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी कारखान्यांची गाळपात आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 23:23 IST

जिल्ह्यातील १३ लाख ५ हजार ६४३ टन ऊस गाळप : १२ लाख ५ हजार ३७५ टन साखरेचे उत्पादन

बारामती : जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांचे १३ लाख ५ हजार ६४३ टन उसाचे गाळप केले आहे. तर १२ लाख ५ हजार ३७५ टन साखरेचे उत्पादन घेतले आहे. यामध्ये बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने सर्वाधिक २ लाख ३ हजार ५९५ टन ऊस गाळप करीत आघाडी घेतली आहे. गाळपामध्ये सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेने तिन्ही खासगी कारखान्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

१३ नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, साखर कारखान्यांचे ऊस गाळप आणि साखर उत्पादन पुढीलप्रमाणे : श्री छत्रपती सहकारी सहकारी साखर कारखाना ५८ हजार ९२४ टन ऊस गाळप,४० हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन, दि माळेगाव सहकारी साखर कारखाना ११ हजार टन ऊसगाळप, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना ९८ हजार ९० टन ऊस गाळप, १ लाख २ हजार क्विंटल साखर उत्पादन, इंदापूर सहकारी साखर कारखाना १ लाख १५ हजार ४१० टन ऊस गाळप, १ लाख ५ हजार ७०० क्विंटल साखर, भीमा कारखाना ३६ हजार टन ऊस गाळप, २३ हजार क्विंटल साखर उत्पादन, श्री विघ्नहर साखर कारखाना १ लाख १९ हजार ४८०, १ लाख १७ हजार १०० क्विंटल, घोडगंगा साखर कारखाना ७७ हजार ८८० टन ऊस गाळप, ७६ हजार ५५० क्विंटल साखर उत्पादन, भीमाशंकर कारखाना, श्री संत तुकाराम कारखाना, नीरा भीमा कारखाना ८३ हजार ३० टन, ८२ हजार क्विंटल साखर उत्पादन, दौंड शुगर कारखाना १ लाख ३१ हजार ७०० टन ऊस गाळप, १ लाख ३३ हजार ७००, श्री अंबालिका कारखाना १ लाख ८० हजार ८१५ टन ऊस गाळप, १ लाख ७५ हजार ९०० क्विंटल साखर उत्पादन, तर अनुराज शुगरने ५८ हजार ७४० टन ऊस गाळप करुन ५५ हजार १०० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.बारामती अ‍ॅग्रोने प्रथम क्रमांकावर आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ श्री अंबालिका शुगर,तर दौंड शुगरने तिसऱ्या क्रमांकावर आघाडी घेतली आहे. साखर उत्पादनात देखील याच तिन्ही कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. यामध्ये माळेगाव कारखाना गाळपामध्ये पिछाडीवर आहे.वाढत्या थंडीचा साखर उत्पादनावर सकारात्मक परिणाम होत आहे. बहुतांश साखर कारखान्यांचा १० टक्के पेक्षा अधिक साखर उतारा आहे. विघ्नहर आणि भीमाशंकर कारखान्याने सर्वाधिक १०.३८ टक्के साखर उतारामिळविला आहे.यंदा साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात अवर्षणग्रस्त स्थितीसह हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने साखर उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेBaramatiबारामती