शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

खासगी बस आदळली ट्रॅक्टरवर; पुणे-सोलापूर महामार्गावरील अपघातात ६ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 14:41 IST

खासगी बसचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळून झालेल्या अपघातात ६ जण जखमी झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने यात मोठी जीवितहानी टळली.

ठळक मुद्देबस चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने टळली मोठी जीवितहानी बऱ्याच वेळा लेन कटिंग करून दुसऱ्या बाजूवर जात असताना घडत आहेत अपघातऊस वाहतूक करणारी वाहने चुकीच्या दिशेने वाहतूक करतानाही पोलीस, आरटीओकडून कारवाई नाही

भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावर काळेवाडी गावच्या हद्दीत खासगी बसचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर आदळून झालेल्या अपघातात ६ जण जखमी झाल्याची घटना पहाटेच्या सुमारास घडली. बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असल्याचे अपघाताचे स्वरूप पाहता दिसून आले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावर काळेवाडी गावच्या हद्दीत सोलापूरहून पुण्याकडे येणाऱ्या खासगी बस नं. के. ए ०१ ए बी ५८७८ बस ची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटरच्या दुसऱ्या ट्रेलरवर आदळल्याने हा अपघात घडला. हा अपघात इतका गंभीर होता की अपघातग्रस्त बस महामार्गाची सोलापूर-पुणे लेन सोडून डिव्हायडरवरून पुणे लेन ओलांडीत शेजारी असणाऱ्या सर्व्हिस रोड सोडून असणाऱ्या ऊसाच्या शेतात घुसली. यात बस ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवित गाडी पलटी होण्यापासून वाचविली. तसेच इतर वाहनांशी धडक न देता उसाच्या शेतात थांबविण्याचा प्रयत्न केला. या अपघातात सहा प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची समस्या वाढत असून दिवसाला एक अपघात घडत आहेत. ट्रॅक्टर चालविणारे ड्रायव्हर वाहनात जोराच्या आवाजाची गाणी ऐकत वेगाने ट्रॅक्टर चालवीत असल्याचे बऱ्याच वेळा दिसून येते. तर काही जन महामार्गावर दोन वाहनांत शर्यत लावतानाही दिसून येतात. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. बऱ्याच वेळा लेन कटिंग करून दुसऱ्या बाजूवर जात असताना अपघात घडत आहेत. तर याकडे आर. टी. ओ प्रशासन आणि महामार्ग पोलीस सोयीस्कररित्या दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघात घडत असून आजच्या अपघातात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.पुणे-सोलापूर महामार्गावर बऱ्याच ठिकाणी ऊस वाहतूक करणारी वाहने चुकीच्या दिशेने वाहतूक करताना दिसून सुद्धा महामार्ग पोलीस आणि आरटीओ कारवाई करताना दिसून येत नाहीत. तसेच लोडचे कारण सांगून मुख्य मार्ग रस्त्याच्या मधोमध वाहने चालविली जात असल्याचेही बऱ्याच ठिकाणी दिसून येते. एका ट्रेलरला दुसरा आणि तिसरा ट्रेलर जोडीत रेल्वेसारखी साखळी वाहतूक मोकळ्या ट्रेलरची केली जात असताना बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचे दिसून येते. तर कर्णकर्कश आवाजात गाणी लावत पाठीमागील वाहनांना साईट न देण्याचे प्रकारही सर्रास घडत आहेत. तसेच पंक्चर अथवा काही वाहनातील बिघाडामुळे रस्त्याच्या कडे ऐवजी मुख्य रस्त्यावरच दुरुस्ती केली जात असल्यामुळेही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणे