शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

डॉ. रामचंद्र देखणे यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले सन्मान जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 19:06 IST

तीन दशकाहून अधिक काळ निष्ठेने डॉ. रामचंर्द्र देखणे यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून विचारजागर केला.

पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा (कै.) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी संतसाहित्याचे आणि लोकसाहित्याचे अभ्यासक व प्रसिद्ध वक्ते डॉ. रामचंर्द्र देखणे यांना जाहीर झाला आहे. दि. १५ जुलै रोजी सायंकाळी  ६ वाजता एस. एम. जोशी फौंडेशन सभागृह येथे होणाऱ्या समारंभात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे आठवे वर्ष असून, यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधुताई सपकाळ, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, न्या. नरेंद्र चपळगावकर यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. संस्थेतर्फे प्रतिवर्षी श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान केला जातो. श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेले इस्लामपूरच्या राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांचा यावर्षी विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.  तीन दशकाहून अधिक काळ निष्ठेने डॉ. रामचंर्द्र देखणे यांनी आपल्या लेखनातून आणि व्याख्यानातून विचारजागर केला. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना डॉ. रामचंद्र देखणे यांच्या विषयी विशेष आपुलकी होती. हा स्नेहानुबंध आणि डॉ. रामचंद्र देखणे यांनी विचारजागर करण्यासाठी दिलेंल्या महत्वपूर्ण योगदानाला अभिवादन करण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचे समितीने ठरविले आहे. इस्लामपूरच्या राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक दजेर्दार कार्यक्रमांचे आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून प्रा. शामराव पाटील सातत्याने करीत आहेत. त्यांच्यामुळे अनेक दिग्गज साहित्यिक, कलावंत आणि वक्ते यांचा लाभ इस्लामपूरकरांना झाला. इस्लामपूरची श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यात प्रा. शामराव पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. म्हणूनच त्यांचा विशेष सन्मान करताना समितीला समाधान वाटत आहे, असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.  

टॅग्स :Puneपुणे