शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
3
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
4
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
5
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
6
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
7
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
8
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
9
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
10
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
11
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
12
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
13
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
14
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

केवळ एकच रुपया मागणारा तत्वनिष्ठ भिकारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 07:00 IST

बालपणापासून नशिबी अपंगत्व आल्याने कष्ट करून जगताना मोठ्या अडचणी होत्या...

संदीप चाफेकर-              यवत : आजच्या युगात समाजातील प्रामाणिक माणसे कमी होत चाललेली असताना  वाढत्या भिकाऱ्यांची समस्या ग्रामीण व शहरी भागात एक मोठी समस्या ठरत आहे.कसलीही शारीरिक विकलांगता नसलेले आणि शारिरीक दृष्ट्या उत्तम असणारे देखील ठिकठिकाणी भीक मागताना आपल्याला सहजपणे नजरेस पडतात.एखाद्याला भीक मागितल्यानंतर काही न दिल्यास वेडेवाकडे बोलून शिव्या शाप देण्यापर्यंत भिकाऱ्यांची मजल जाते.             मात्र याला अपवाद म्हणा किंवा आजच्या काळातील दुर्मिळ उदाहरण म्हणा  , एक प्रामाणिक भिकारी मागील दहा ते पंधरा वर्षांपासून भीक मागून त्यांचे आयुष्य जगत आहे.आता भिकारी म्हटल्यावर तो प्रामाणिक आणि अप्रामाणिक कसा ठरवायचा असा प्रश्न निश्चितच पडेल मात्र हा भिकारी कोणाकडूनही एक रुपयांपेक्षा जास्तीची भीक घेत नाही एखाद्याने एक पेक्षा जास्तीचे रुपये दिल्यास तो प्रामाणिकपणे नकार देऊन एक रुपया घेऊन उरलेले पैसे तर परत देतो.कोणी न दिल्यास काही वाईट न बोलता हसतमुख निघून जातो हीच काय ती त्याची आयुष्यातील प्रामाणिकता आहे यातून त्याला मोठे समाधान मिळत असल्याचे सांगतो.त्याच्या याच वृत्तीमुळे त्याला ओळणारे अनेक व्यापारी , बाजारकरू छोटे व्यावसायिक बोलवून त्याला मदत देऊ करतात मात्र त्यांच्याकडूनही तो एक रुपयांपेक्षा जास्तीची मदत घेत नाही.              हिरामण सिग्राम दाते यांचे वय सध्या ६० वर्षे झाले असून वाढत्या वयानुसार काम करणे शक्य नसल्याने मागील दहा ते पंधरा वर्षांपासून भीक मागून जगण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहिला नव्हता.बालपणापासून नशिबी अपंगत्व आल्याने कष्ट करून जगताना मोठ्या अडचणी होत्या.पिढ्यान पिढ्या चालत आलेला दगड फोडून मजुरी करण्याचे काम हिरामण यांनी केल्याचे ते सांगतात.आता वय वाढल्याने दगड फोडण्याची शक्ती अंगात नाही याचबरोबर ६३ % अपंगत्व असल्याने जगायचे कसे हा प्रश्न होताच आता भीक मागायची वेळ आली असली तरी त्यांनी आयुष्यातील प्रामाणिक वृत्ती मात्र अजूनही जोपासली आहे.             सर्व काही साधने , उत्कृष्ट शरीर लाभले असतानाही नशिबाला आणि दैवाला दोष देणारी अनेक माणसे आपण समाजात पाहातो मात्र हिरामण दाते यांच्यासारख्या माणसाची जिद्द आणि समाधानी वृत्ती पाहिल्यानंतर निश्चितच अनेकांना त्यांचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही.             भिगवण (ता.इंदापूर) येथे मागील अनेक वर्षे हिरामण दाते वास्तव्यास आहेत.घरात पत्नी आणि एक मुलगा असून पत्नी रस्त्याची कामे सुरू असतात तिथे मजुरी करते तर मुलगा इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत आहे.शिक्षणासाठी मुलाला त्याच्या आजोळच्या लोकांचे सहकार्य मिळत आहे.मात्र जातीचे पुरावे जवळ नसल्याने जातीचा दाखला मिळत नाही आणि जातीचा दाखला नसल्याने मुलाला शिक्षणातील सवलतीचा फायदा देखील मिळत नाही यामुळे जातीच्या दाखल्याची मोठी अडचण असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Puneपुणे