शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर अखेर शिक्कामोर्तब ! येत्या शनिवारी 'सिरम'ला देणार भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 19:40 IST

मोदी यांच्या पुणे दौऱ्याची प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू..

पुणे : संपूर्ण जगाचे लक्ष सध्या कोरोनावरील लस तयार करणाऱ्या पुण्यातील " सीरम  इन्स्टिट्यूट " कडे लागले आहे. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार (दि.28) रोजी पुणे दौऱ्यावर येत असून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन लसची निर्मिती आणि वितरणाची तयारी याचा आढावा घेणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांना दिली. 

ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना व्हायरसवरील लस उत्पादनाच्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे. जगात अनेक देशांमध्ये कोरोना लसीवर काम सुरू असून, अनेकांनी आपली लस अंतिम टप्प्यात आल्याचे जाहीर देखील केले आहे.

यामध्ये भारताने आघाडी घेतली असून, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेल्या लसीकडे संपूर्ण जगाचे लाक्ष आहे. यासाठीच तब्बल शंभर देशांचे राजदूत व संबंधित अधिकारी 4 डिसेंबर रोजी पुण्यातील सीरम व जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देऊन लसी संदर्भात माहिती घेणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजदूत येण्यापूर्वी स्वत: मोदी पुण्यात येऊन सीरम मध्ये आढाव घेणार आहेत. याबाबत राव यांनी सांगितले,  गुरूवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौ-या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत पत्र आले. परंतू त्यापूर्वीच पंतप्रधान दौऱ्याची सर्व तयारी सुरू होती. दिल्लीतील केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान गुरूवारी (दि.26) रोजी दाखल झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान दौऱ्यात विषेश खबरदारी घेण्यात येत असल्याचे राव यांनी सांगितले. याच शिवाय शंभर राजदूत यांच्या दौऱ्याची देखील तयारी सुरू असल्याचे राव यांनी स्पष्ट केले. -------असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा- दुपारी 12.30 वाजता लोहगाव येथील टेक्निकल एअरपोर्ट आगमन - लोहगाव येथून स्पेशल हेलिकॉप्टरने सीरम येथे आगमन - दुपारी 1 ते 2 या एक तासात सीरम येथे आढावा - दुपारी 2 वाजता सीरम येथून हेलिकॉप्टरने लोहगावा - लोहगाव येथून हैद्राबादकडे रवाना

टॅग्स :PuneपुणेNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या