शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

...म्हणून आता पंतप्रधान मोदींनाही पुणे हवेहवेसे वाटू लागले आहे : सुप्रिया सुळेंची मिश्किल टिपण्णी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 17:09 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून ते सिरम इन्स्टिट्यूटला देखील भेट देणार आहेत.

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येत आहे. यावेळी ते कोरोनावरील लस निर्माण करत असलेल्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे. तसेच अवघ्या जगाचे लक्ष लागून असलेली कोरोनावरील लसची निर्मिती व वितरण प्रक्रिया देखील जाणून घेणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नरेँद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर भाष्य केले आहे. 

सुप्रिया सुळे या पुणे पदवीधर निवडणुकीतील महविकास आघाडीच्या उमेदवार असलेले अरुण लाड यांच्या प्रचारार्थ त्या इंदापूर इथे आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बोलत होत्या.

सुळे म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येत असून ते सिरम इन्स्टिट्यूटला देखील भेट देणार आहेत. मात्र आपले महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन बरोबर वर्षपूर्ती होत असताना देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यात कोरोना लसीवर जे काही महत्वपूर्ण काम होत आहे ते पाहण्यासाठी येत आहे यापेक्षा आपल्या सरकारचे यश काय असणार आहे.? तसेच पंतप्रधान हे वेगळ्या विचारांचे असले तरी त्यांनाही आता पुणे हवंहवंस वाटू लागले आहे, अशी मिश्किल टिप्पणी देखील सुळे यांनी यावेळी केली.

रिकामी भांडीच जास्त आवाज करतात.. सुप्रिया सुळेंचा विरोधी पक्षाला टोलाआयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. आज आमची आहे कधीतरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही. परंतु, काही लोक सारखे सारखे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असे बोलत असतात. त्यांच्या बोलण्याची मला फार गंमत वाटते. पण नेहमी रिकामी भांडीच जास्त आवाज करतात मात्र भरलेली भांडी कधीही आवाज करत नाही. अशा शब्दात सुळे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना जोरदार टोला लगावला आहे.  

तुम्हाला पाहिजे तितका आवाज करा. आणि समजा आमचे महाविकास आघाडी सरकार पडले तर पुढे काय करायचे ते आम्ही पाहून घेऊ. पण तूर्तास तरी आमचे सरकार स्थिर असून ते आपला कार्यकाळ नक्कीच पूर्ण करेल असा ठाम विश्वास देखील सुळे यांनी यावेळी व्यक्त केला. 

 

टॅग्स :PuneपुणेSupriya Suleसुप्रिया सुळेNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliticsराजकारण