शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

अहिल्यादेवींच्या आदर्शाप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांचे काम - देवेंद्र फडणवीस

By राजू इनामदार | Updated: May 30, 2025 18:47 IST

केंद्र सरकारचे सगळे काम हे आहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे असे फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले

पुणे: तीर्थस्थळांचा विकास, समान न्याय, महिलांची सैनिकी तुकडी, स्वदेशी शस्त्रात्रांची निर्मिती या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या आदर्श राज्यकारभाराप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही काम सुरू आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. देशात खरी आत्मनिर्भरता त्यांनीच आणली असे ते म्हणाले.

अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मत्रीशताब्दीनिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा संवाद कार्यक्रमाचे शुक्रवारी दुपारी मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानात आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उपस्थित युवकांशी संवाद साधला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, योगेश टिळेकर, युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रभारी विक्रांत पाटील, प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे व भाजपचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

फडणीस म्हणाले, “पतीनिधनानंतर सासरे मल्हारबा होळकर यांनी अहिल्यादेवींना सती जाऊ न देता राज्यकारभार करण्याचा आदेश दिला. तो त्यांनी पाळला. सलग २८ वर्षे त्यांनी राज्य केले. राजमाता असूनही त्यांनी साधी राहणी आचरली. त्यांनी असा कारभार केला की आजही त्याचा आदर्श कायम आहे. तीर्थस्थळांचा त्यांनी विकास केला. केंद्र सरकारला काशी विश्वेश्वर स्थळी विकासकामे करता आली, याचे कारण तिथे अहिल्यादेवींनी आधीच कितीतरी कामे केली होती. महिलांची स्वतंत्र सैनिकी तुकडी करून त्यांना संरक्षणाचे काम देणाऱ्या त्या महाराणी होत्या. शस्त्रात्रांचे संशोधन तर त्यांनी केलेच, शिवाय त्याचे कारखानेही काढले. सर्वांना समान न्याय हे त्यांच्या कामकाजाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच २८ वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या राज्याकडे कोणीही वाकडी नजर टाकू शकले नाही.”

पंतप्रधान मोदी यांनीही ऑपरेशन सिंदूर ची ब्रिफिंग करण्याचे काम दोन महिला सैनिकी अधिकाऱ्यांना दिले. आपण विकसीत केलेल्या ब्रह्मोस या प्रणालीने पाकिस्तानचे एअरबेस उध्वस्त केले. मोदींनी राम मंदिराचे पुनर्निमाण केले. केंद्र सरकारचे सगळे काम हे आहिल्यादेवींच्या राज्यकारभाराप्रमाणेच आदर्श आहे असे फडणवीस यांनी थेट तुलना न करता स्पष्ट केले. अहिल्यादेवींच्या कामाचा आदर्श युवकांनी घ्यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज ज्याप्रमाणे महाराज असूनही कशाचाही उपभोग न घेणारे श्रीमंत योगी होते, अगदी त्याप्रमाणेच अहिल्यादेवीसुद्धा राजमाता, महाराणी असूनही अतीशय साध्या रहात असत. कोणत्याही संपत्तीचा किंवा श्रीमंतीचा त्यांनी उपभोग घेतला नाही. देवभक्ती करत त्या कारभार पहात असत असे फडणवीस म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदी