पंतप्रधान मोदी आज पुण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 04:11 AM2020-11-28T04:11:37+5:302020-11-28T04:11:37+5:30

पुणे : कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर तब्बल शंभर देशांचे राजदूत पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट व जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला ४ डिसेंबर रोजी ...

Prime Minister Modi in Pune today | पंतप्रधान मोदी आज पुण्यात

पंतप्रधान मोदी आज पुण्यात

Next

पुणे : कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर तब्बल शंभर देशांचे राजदूत पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट व जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला ४ डिसेंबर रोजी भेट देणार होते. परंतु, राजदूतांचा हा दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. दौरा निश्चित झाल्यावर पुन्हा कळविण्यात येईल, असे पत्र आल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरल्याप्रमाणे शनिवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत.

इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत संशोधित होणाऱ्या कोरोनावरील लसीच्या उत्पादनाचे हक्क पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने मिळवले आहेत. ऑक्सफोर्डच्या लसीच्या प्राथमिक चाचण्या समाधानकारक आल्या आहेत. त्यामुळे लस उत्पादनाची जगातली सर्वात मोठी क्षमता असल्याने ‘सिरम’कडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.

या पार्श्वभूमीवर तब्बल शंभर देशांचे राजदूत येत्या ४ डिसेंबरला पुणे दौऱ्यावर येणार होते.

Web Title: Prime Minister Modi in Pune today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.