शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
4
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
5
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
6
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
7
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
8
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
9
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
10
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
11
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
12
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
13
विशेष लेख: राम आणि कृष्णकथेच्या हृदयातले अमृत!
14
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
15
चिंताजनक! कोणतेही प्रशिक्षण नसलेल्यांकडून भारतात २.५ टक्के महिलांची होतेय प्रसूती, महाराष्ट्रात स्थिती काय?
16
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 
17
रामायण केवळ कथा नाही तर धर्म, जीवन जगण्याची कला : मोरारीबापू
18
गणपती विसर्जन सोहळ्यावर शोककळा; वेगवेगळ्या घटनांमध्ये 5 जणांचा मृत्यू  
19
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
20
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...

भेंडी, टोमॅटो, गवार, फ्लॉॅवर, शेवगा, मटार, अन् पावट्याचे भाव प्रचंड वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डात रविवारी भेंडी, टोमॅटो, गवार, फ्लॉॅवर, शेवगा, मटार, अन् पावट्याचे भाव प्रचंड वाढले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डात रविवारी भेंडी, टोमॅटो, गवार, फ्लॉॅवर, शेवगा, मटार, अन् पावट्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. तर, हिरव्या मिरचीच्या भावात घट झाली आहे. अन्य इतर सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर होते. मागील आठवड्याच्या तुलनेत आवक कमी होते. मुख्यत: पितृ पंधरवड्यामुळे दरवाढीवर परिणाम झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मार्केट यार्डात १०० गाड्यांची आवक झाली. इतर राज्यांतून आलेल्या मालात गुजरात आणि कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू येथून २ ते ३ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेश येथून २ ते ४ टेम्पो गाजर, गुजरात, आंध्र प्रदेश व कर्नाटक येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, तर कर्नाटकातून घेवड्याची २ टेम्पो आवक झाली. तसेच गुजरात व मध्य प्रदेश येथून लसणची १०-१२ ट्रक, तर आग्रा, इंदूर तसेच स्थानिक भागातून ५५-६० ट्रक बटाट्याची आवक झाली.

स्थानिक आवकेमध्ये सातारी आले १४०० ते १५०० गोणी, प्लॉवर ७ ते ८ टेम्पो, कोबी सुमारे ५ ते ६ टेम्पो, गवार ७ ते ८ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो ७ हजार पेटी, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, भुईमूग १५० ते १७५ पोती, मटार १०० ते १५० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, पुरंदर, वाई आणि साताऱ्याहून मटार १०० ते १५० गोणी, कांदा ४० ते ४५ ट्रक आवक झाली आहे.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :

कांदा : १७०-२१०, बटाटा : ८०-१३०, लसूण ३००-९००, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : २००-३००, गवार : (गावरान) ६००-७००, (सुरती) ५००-६००, टोमॅटो : १००-२००, दोडका : २००-३००, हिरवी मिरची : १००-२००, दुधी भोपळा : १००-१५०, चवळी : २५०-३००, काकडी : १००-१५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २५०-३००, फ्लॉॅवर : ३००-४००, कोबी : ६०-८०, वांगी : २५०-३५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, कारली हिरवी १४०-१५०, पांढरी ९०-१००, ढोबळी मिरची : २००-४००, तोंडली : कळी २८०-३००, जाड, १२०-१४०, शेवगा : ४००-४५०, गाजर २००-२५०, वालवर ३००-३५०, बीट : ८०-१००, घेवडा : ३००-३५०, घोसावळे : २५०-३००, ढेमसे : ३००-३५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : २५०-३००, भुईमुग शेंग : ३५०-४००, मटार : स्थानिक: १०००-१४५०, पावटा : ३५०-४००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ६०-१००, नारळ : शेकडा १०००-१६००.

चौकट

या फळभाज्यांचे वाढले भाव (प्रतिकिलोचे दर)

शेवगा ५०-५२

टोमॅटो १८-२२

ढोबळी इंडस ४०-४५

ढोबळी इंद्रा ३०-३२

फ्लावर २५-३०

गवार सुरती ५०-६०

गवार गावरान ७०-८०

वाटाणा १३०-१४०

तोंडली कळी ३०-४०

डांगर १०-१२

बीन्स ३५-४०

-------

चौकट

या फळभाज्यांचे भाव घटले (प्रतिकिलोचे दर)

दुधी १२-१६

रताळी १४-१६

------

चौकट

या फळभाज्यांचे भाव आहेत स्थिर (प्रतिकिलोचे दर)

वांगी ३०-३२ मिरची सफेद १४-१६

मिरची काळी २०-२२

कारली १६-२०

बीट ८-१२

भेंडी २५-३५

काकडी १२-१६

आले १५-२५

लसूण ६०-७०

दोडका ३०-३५

कोबी ५-६

गोसावळी २०-२५

चवळी २०-२५

भु. शेंगा ३५-४०

गाजर १५-२०

कांदा १६-२२

बटाटा १०-१२

फोटो : मार्केट यार्डात रविवारी कोबी, टोमॅटो, कारली आणि काकडीची आवक झाली.

फोटो - कोबी