शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य
4
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
5
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
6
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
7
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
8
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
9
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
10
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
11
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
12
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
13
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
14
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
15
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
16
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
17
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
18
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
19
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती

लसूण, सिमला मिरची, हिरवी मिरची, प्लॉवर, कोबीचे दर उतरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:27 IST

पुणे : सध्याच्या पोषक वातावरणामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक चांगलीच वाढली आहे. यामुळेच लसूण, सिमला मिरची, हिरवी मिरची, प्लॉवर ...

पुणे : सध्याच्या पोषक वातावरणामुळे मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक चांगलीच वाढली आहे. यामुळेच लसूण, सिमला मिरची, हिरवी मिरची, प्लॉवर आणि कोबीच्या दरात घट झाली आहे. तर अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर आहे.

गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि.१३) रोजी ९० ते १०० गाड्या शेतमालाची आवक झाली. यात परराज्यातून

आलेल्या मालामध्ये राजस्थान येथुन १० ट्रक गाजर, कर्नाटक, गुजरात येथुन ४ ते ५ टेम्पो कोबी, कर्नाटक आणि तामिळनाडू येथुन १० ते १२ टेम्पो हिरवी

मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडु येथुन शेवगा २ टेम्पो, मध्यप्रदेशातून मटार २५ ट्रक, तर मध्यप्रदेश आणि गुजरात येथून १४ ते १५ ट्रक आवक लसणाचीझाली होती. स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १४०० ते १५०० गोणी, कोबी सुमारे ७ ते ८ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, टोमॅटो ६ ते सात हजार पेटी, भुईमुग शेंगा सुमारे ५० ते ६० गोणी, घेवडा ३ ते ४ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ५ ते ६ टेम्पो, पावटा ५ ते ६ टेम्पो,

कांद्यामध्ये जुना १०० ट्रक, तर नवीन कांद्याची ३० ट्रक इतकी आवक झाली.

--

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : २५०-३५०, बटाटा : २५०-३००, लसूण :

४००-९००, आले : सातारी १००-२००, भेंडी : २००-२५०, गवार : २००-२५०, टोमॅटो

: १५०-२००, दोडका : १५०-२००, हिरवी मिरची : २००-२५०, दुधी भोपळा : ५०-७०,

चवळी : १४०-१६० काकडी : ६०-१००, कारली : हिरवी १५०-२००, पांढरी १००-१२०,

पापडी : १५०-१६०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : ३०-४०, कोबी : ५०-८०, वांगी :

६०-१००, डिंगरी : १४०-१५०, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : १२०-१४०,

तोंडली : कळी १८०-२००, जाड : ९०-१००, शेवगा : ७००-७५०, गाजर : १६०-२२०,

वालवर : २४०-२६०, बीट : ८०-१००, घेवडा : २००-२५०, कोहळा : १००-१२०,

आर्वी: १००-१२०, घोसावळे : १६०-२००, ढेमसे : १८०-२००, पावटा : २५०-३००,

भुईमूग शेंग : ४००-५००, मटार : २००-३२०, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण :

१६०-१८०, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

--

भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर

कांदा २५-३५ ४०-५०

बटाटा २५-३० ४५-५०

टोमॅटो १५-२० २५-४०

भेंडी २०-२५ ३०-४०

गवार २०-२५ २५-३०

मिरची २०-३५ ४०-५०

कोथींबीर ०८-१० १०-१५

मेथी ७-९ १०-१५

मटार २९-३२ ४०-५०

-------

कोथींबीर, करडई मुळे चुका, हरभरा गड्डीचे दर उतरले

तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक वाढल्याने कोथींबीर,

करडई, मुळे, चूका आणि हरभरा गड्डीच्या दरात घट झाली आहे़. तर कांदापात, चाकवत, अंबाडी, आणि पालकच्या भावात घट झाली असून मेथी, शेपू, पुदीना, राजगिरा आणि चवळईचे दर स्थिर आहेत. रविवारी मार्केटयार्डात कोथींबीरीची २ लाख जुड्यांची आवक झाली तर

मेथीची ८० हजार जुड्यांची आवक झाली. घाऊक बाजारात कोथींबीर जुडीमागे ५० पैसे, करडई दोन रुपये, मुळे तीन

रुपये, चूका एक रुपया, आणि हरभरागड्डी चार रुपयांनी उतरली. तर कांदापात पाच रुपये, चाकवत एक रुपये, अंबाडी पाच रुपये, पालक एक रुपयांनी वाढ झाली

आहे.

---

हिवाळ्यात सर्वच भाज्या मनसोक्त मिळतात

सध्या बाजारात सर्वच भाज्या मुबलक प्रमाणात व स्वस्त देखील मिळत आहेत. कोरोना नंतर प्रथमच चांगल्या दर्जेच्या फळभाज्या व पालेभाज्या मिळत आहे. दर वर्षी हिवाळ्यात मुबलक प्रमाणात भाज्या उपलब्ध होतात.

- सिंधु भुसे, गृहिणी