शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पुणे शहराचे ६७६५ कोटींचे अंदाजपत्रक सादर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 12:10 IST

उत्पन्न वाढीचे कोणतेही ठोस प्रयत्न न करता व जमा-खर्चाचा ताळमेळ न घालता स्थायी समितीने जीएसटी , मिळकत कर आणि शहर विकास शुल्क या पारंपरिक स्त्रोतांवरच उत्पन्नवाढीची मदार ठेवली आहे.

ठळक मुद्देआयुक्तांच्या अंदाजपत्रकात तब्बल ६८० कोटींची वाढ.अध्यक्षाच्या मतदार संघातील नगररोडसाठी  १०० कोटींची तरतुद             समाविष्ट गावांसाठी १९२ कोटी          

पुणे:  आयुक्ताप्रमाणेच उत्पन्न वाढीचे कोणतेही ठोस प्रयत्न न करता व जमा-खर्चाचा ताळमेळ न घालता स्थायी समितीने महापालिकेचे आगामी आर्थिक वर्षांसाठीचे (सन २०१९-२०)तब्बल ६ हजार ७६५ कोटींचे अंदाजपत्रक शुक्रवारी (दि.२२) मुख्य सभेला सादर केले.                                               स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी अंदाजपत्रक सादर करताना कोणत्याही लोकप्रिय व नव्या योजनांची घोषणा करण्याऐवजी जुन्याच योजनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. परंतु, आगामी निवडणुका लक्षात घेता मुळीक यांनी आपल्या मतदार संघातील नगररस्त्याच्या वाहतूक आराखड्यासाठी भरघोस तब्बल १०० कोटी तरतुद केली आहे .याशिवाय दृष्टिहीनांसोबतच्या मदतनिसाला पण पीएमपीचा मोफत पास सेवेसाठी ३० लाख रुपये , महिलांसाठी कर्करोग निदान चाचणी ची अल्पदरात सुविधा उपलब्ध करून देणे, शहरात बांबू लागवडीसाठी एक कोटीची तरतुद, वारकरी सांस्कृतिक भवनसाठी सव्वा दोन कोटी अशा काही समाज उपयोगी योजनांचा मुळीक यांनी आपल्या अंदाजपत्रक समावेश केला आहे.            सन २०१९-२० या आर्थिक वर्षांसाठी ६ हजार ८५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केले होते. या अंदाजपत्रकाला अंतिम स्वरूप स्थायी समितीने दिले आणि आयुक्तांच्या अंदाजपत्रकामध्ये ६८० कोटी रुपयांची वाढ करत ६ हजार ७६५ कोटींचे अंदाजपत्रक मुळीक यांनी सादर केले. जीएसटी , मिळकत कर आणि शहर विकास शुल्क या  पारंपरिक स्त्रोतांवरच उत्पन्नवाढीची मदार आहे. मिळकत कर थकबाकी वसुलीवर त्यासाठी भर देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे विविध प्रकारची थकबाकी वसुलीसाठी प्रभावी यंत्रणा राबविण्याचे, तसेच शासनाकडे असलेल्या थकबाकीसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे योगेश मुळीक यांनी अंदाजपत्रक सादर करतांना सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBudget 2019अर्थसंकल्प 2019Mukta Tilakमुक्ता टिळक