शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

तयारी गणेशोत्सवाची : खरेदीसाठी ग्रामस्थांची लगबग, सासवडला गणेशमूर्तीवर अखेरचा हात....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 03:04 IST

महाराष्ट्राचा गौरवशाली गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असताना विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची निर्मिती आणि रंगकामाला सासवडच्या कुंभारवाड्यात वेग आला आहे. दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा आदी मूर्तींना ग्राहकांची मागणी असून, बाहुबलीच्या रूपातील गणेशमूर्तीदेखील विक्रीस ठेवल्याचे येथील पारंपरिक कुंभार व्यवसाय करणारे हरिदास कुंभार यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : महाराष्ट्राचा गौरवशाली गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असताना विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची निर्मितीआणि रंगकामाला सासवडच्या कुंभारवाड्यात वेग आला आहे. दरवर्षीप्रमाणे दगडूशेठ हलवाई, लालबागचा राजा आदी मूर्तींना ग्राहकांची मागणी असून, बाहुबलीच्या रूपातील गणेशमूर्तीदेखील विक्रीस ठेवल्याचे येथील पारंपरिक कुंभार व्यवसाय करणारे हरिदास कुंभार यांनी सांगितले.जीएसटीचा गणेशमूर्तींच्या विक्रीवर काही प्रमाणात परिणाम होणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले. बाजारात स्पर्धेला तोंड देण्यासाठी नवीन प्रयोग म्हणून आकर्षक कलाकुसर केलेल्या हारांच्या गणेशमूर्तींची निर्मिती केल्याचेही त्यांनी सांगितले.चार महिन्यांपासून गणेशमूर्ती बनविण्याच्या कामाला सुरुवात केली असून, या वर्षी अंदाजे आठशेहून अधिक मूर्ती बनविल्याचे कुंभार यांनी सांगितले. नऊ इंचापासून साडेपाच फूट उंचीच्या मूर्ती बनविण्यात आल्या असून, त्या बाजारात साडेतीनशे रुपयांपासून बारा हजारांपर्यंत विकल्या जाणार आहेत. पेन गन, कप गन, ब्रश, चमक, वेलवेट, नैसर्गिक व फ्लोरोसंट रंग, लेस, खडे आदींचा वापर करून आमची ही तिसरी पिढी मूर्ती बनवीत असल्याचे हरिदास, प्रताप, राजेंद्र आणि पोपट या कुंभार बंधूंनी सांगितले.लोकांच्या मागणीनुसार तसेच कालपरत्वे वेगवेगळ्या स्वरूपातील मूर्तींची मागणी वाढत असून लालबागचा राजा, दगडूशेठ, बाहुबली रूपातील तसेच मोरावर आरूढ झालेला गणेश आदी स्वरूपाच्या मूर्ती बनविण्यात आल्याचे विजय कुंभार यांनी सांगितले.मूर्ती ठेवण्यासाठी जागा मिळावीसासवडमध्ये सर्व मिळून अंदाजे पंधरा हजार मूर्ती विक्रीसाठी येत असतात. गणपतीमूर्तीबरोबरच सजावटीचे साहित्य विकणारेही असतात. यानिमित्ताने, गणेशमूर्ती बनविण्यासाठी आणि त्या सुरक्षित ठेवण्यासाठी पुण्याच्या केशवनगरसारखी पर्यायी जागा सासवडमध्ये नगरपालिकेने भविष्यात उपलब्ध करून द्यावी आणि या परंपरागत कुंभार व्यवसायाला ताकद द्यावी, अशी अपेक्षा कुंभारबंधूंनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव