पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर; 9 संघांची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 11:12 PM2022-01-17T23:12:26+5:302022-01-17T23:25:52+5:30

भरत नाट्य मंदिर येथे गेल्या चौदा दिवसांपासून रंगलेल्या स्पर्धेमध्ये 50 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी सोमवारी पार पडली.

Preliminary round results of Purshottam Trophy announced; Selection of 9 teams | पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर; 9 संघांची वर्णी

पुरूषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर; 9 संघांची वर्णी

Next

पुणे : अरे आव्वाज कुणाचा’ च्या जल्लोषात सुरू झालेल्या पुरूषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये नऊ संघ दाखल झाले आहेत. महाराष्ट्र कलोपासक संस्थेतर्फे दरवर्षी घेण्यात येणारी ही स्पर्धा महाविद्यालयीन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. कोरोनामुळे स्पर्धेच्या परंपरेत काहीसा खंड पडला. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याने संस्थेने स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला. त्यानुसार भरत नाट्य मंदिर येथे गेल्या चौदा दिवसांपासून रंगलेल्या स्पर्धेमध्ये 50 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेची प्राथमिक फेरी सोमवारी पार पडली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये 9 संघांची वर्णी लागली. त्यामध्ये आयएमएमसी (वरात), कावेरी महाविद्यालय (सफर), प.भू वसंतदादा पाटील इंडस्ट्री आॅफ टेक्नॉलॉजी, बावधान (कला?), बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (मंजम्मा पुराणम), श्रीमती काशीबाई नवले अभिायांत्रिकी महाविद्यालय (एव्हरी नाइट इन माय ड्रीम्स), पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर (सहल), मॉर्डन महाविद्यालय, गणेशखिंड (भाग धन्नो भाग), अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (पाणीपुरी) आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालय (कंप्लीट व्हॉईड) या
संघांचा समावेश आहे.

स्पर्धेची अंतिम फेरी दि. 22 व 23 जानेवारी रोजी होणार असून, दरवर्षीप्रमाणे शेवटच्या दिवशी त्या त्या फेरीतील निकाल जाहीर होतील.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 29 जानेवारी रोजी होईल. स्पर्धेचे परीक्षक म्हणून मयुरेश कुलकर्णी, विश्वास करमरकर आणि मंदार पटवर्धन यांनी काम पाहिले.

स्पर्धेतील अभिनयासाठी उत्तेजनार्थ पारितोषिके
अनुष्का गोखले (ठसका, एम एम सी सी), मैत्रेयी हातवळणे ( हिरवीन, पी सी सीओ ई), अरूण गावडे (अस्थिकलश, मॉडर्न महाविद्यालय), तन्वी कांबळे (शोधयात्रा, कमिन्स), राज निंबाळकर (लाल, टीमवि), अथर्व शेटे (द हंगरी, म.ए सो सीनिअर महाविद्यालय), मुकुल ढेकले (घुंगरू एमएमसीसी), ॠषिकेश वनवे (झापडं, जी एच रायसोनी), राघव वर्तक (कधीतरी, इंडसर्च) आणि राजेश
नागरगोजे (क्षुधा, टिळक आयुर्वेद महाविद्यालय)

* उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शक शुभम शहाजी घोडके (म्हातारा पाऊस, न्यू आटर््स महाविद्यालय)
*उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शक शांभवी जोशी (शोधयात्रा, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालय)

Web Title: Preliminary round results of Purshottam Trophy announced; Selection of 9 teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.