शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

गरोदर महिलेने विवाहित असणे आवश्यक!; पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अजब कायदा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 15:56 IST

महापालिकेच्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी एका अविवाहित गरोदर महिलेस दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यावरून महिलांमध्ये रोष निर्माण झाला असून संबधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देअविवाहित महिलेल्या प्रसुतीस नकार देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचे आयुक्तांचे आश्वासनआमदार गोऱ्हे यांनी त्यांच्या स्त्री आधार केंद्रामार्फत या प्रकरणाची केली चौकशी

पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील काहीजणांनी स्वत: होऊन अजब कायदा सुरू केला आहे. गरोदर महिलेने विवाहित असणे आवश्यक आहे हा तो नियम. त्याला अनुसरून महापालिकेच्या एका रुग्णालयातील डॉक्टरांनी एका अविवाहित गरोदर महिलेस दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यावरून महिलांमध्ये रोष निर्माण झाला असून संबधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.अविवाहित महिलेल्या प्रसुतीस नकार देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी आमदार डॉ. निलम गोऱ्हे यांना दिले. डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली. काँग्रेसच्या शहर सरचिटणीस संगीता तिवारी यांनीही यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून पुन्हा असे होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी केली.महापालिकेच्या एका रुग्णालयात गरोदर महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेताना ती विवाहित आहे का याची विचारणा करण्यात आली. तसे नसल्याने तिला दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्या महिलेला खासगी रुग्णालयात प्रसुती करून घ्यावी लागली. आमदार गोऱ्हे यांनी त्यांच्या स्त्री आधार केंद्राच्या अनिता शिंदे व विभावरी कांबळे यांच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी केली. आयुक्तांनी त्यांना कारवाईचे आश्वासन दिले.संगीता तिवारी यांनी प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली साबणे यांना पत्र पाठवून महापालिकेने फक्त विवाहित महिलांनांच दाखल करून घेतले जाईल असा नियम कधी केला अशी विचारणा केली. एखाद्या महिलेच्या संदर्भात डॉक्टरांनी असे वागावे हे निषेधार्ह असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. संबधित महिलेला त्रास होता, त्वरीत दाखल करून घेणे गरजेचे होते. अशा वेळी यंत्रणा त्यांच्याकडे नाही ती चौकशी करीत बसली व अत्यंत निर्दयपणे विवाहित नाही तर दाखल करून घेतले जाणार नाही असे उत्तर दिले. या प्रकरणाची दखल घ्यावी व संबंधित डॉक्टरांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.

टॅग्स :Neelam gorheनीलम गो-हेPuneपुणेkunal kumarकुणाल कुमार