शहरं
Join us  
Trending Stories
1
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
2
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
3
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
4
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
5
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
6
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
7
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
8
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
9
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
10
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
11
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
12
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
13
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
14
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
15
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
16
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
17
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
18
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
19
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
20
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची

घोरपडी रेल्वे उड्डाणपुलाला प्राधान्य

By admin | Updated: October 23, 2014 05:04 IST

शहरी भाग असून पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. घोरपडी गाव आणि बाजारपेठ परिसरातील नागरिकांना सर्वाधिक भेडसावणा-या रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे

पुणे : शहरी भाग असून पुणे कॅन्टोन्मेंट परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. घोरपडी गाव आणि बाजारपेठ परिसरातील नागरिकांना सर्वाधिक भेडसावणा-या रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्न सोडविण्याला मी प्राधान्य देणार आहे. त्यादृष्टीने आजच केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री राव इंदरजित सिंह यांच्याशी बोलणे झाले असल्याचे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार दिलीप कांबळे यांनी सांगितले़कांबळे यांनी आज लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली़ ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर यांनी त्यांचे स्वागत केले़ या वेळी मतदारसंघातील प्रश्न आणि भावी योजना याविषयी त्यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय सहकाऱ्यांशी संवाद साधला.या वेळी डॉ. शिवाजीराव सरोदे, रवींद्र पाटील, हरीश भाबड आणि प्रवीण ओसवाल उपस्थित होते. कांबळे म्हणाले, ‘‘घोरपडी गाव व मुंढवा येथून दोन रेल्वेमार्ग जातात़ दिवसातील १२ तासांपैकी किमान ६ तास हे रेल्वे फाटक बंद असते़ फाटक बंद असल्याने नागरिक, विद्यार्थी, व्यावसायिक यांना खूप त्रास सहन करावा लागतो़ अनेकदा रुग्णवाहिकाही त्यात अडकून पडते़ हा उड्डाणपूल व्हावा, याला मी प्राधान्य दिले असून राव इंदरजित सिंह पुण्यात आले असता त्यांना निवेदन दिले होते़ त्या वेळी त्यांनी आचारसंहिता संपल्यावर यावर कार्यवाही करू, असे आश्वासन दिले़ आज त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलल्यावर त्यांनी हे निवेदन संबंधित विभागात पुढील कार्यवाहीसाठी दिले आहे. खासदार अनिल शिरोळेही केंद्रीय पातळीवरून या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत़ पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शेरी या तिन्ही मतदारसंघांतील नागरिकांच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. येथील भाजपचे तिन्ही आमदार त्याचा एकत्रितपणे पाठपुरावा करू. या उड्डाणपुलाजवळ सरंक्षण खात्याची काही संवेदनशील कार्यालये असल्याचे सांगण्यात येत आहे. ती अन्यत्र हलवून इतर कार्यालये येथे आणावीत, असा प्रस्ताव संरक्षण विभागाला दिला आहे. सर्व अडथळे पार करून हा उड्डाणपूल लवकरात लवकर होईल, याला प्राधान्य देणार आहे़ ’’ते पुढे म्हणाले, ‘‘पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात झोपडपट्टीवासीयांची संख्या मोठी आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या (एसआरए) नियमावलीमध्ये अनेक त्रुटी आहेत़ त्या दूर करून तिच्या अंमलबजावणीला गती देण्याचा प्रयत्न असणार आहे. या योजनेतून बांधकाम व्यावसायिकांपेक्षा नागरिकांचा जास्त फायदा व्हावा, अशी आपली भूमिका आहे.’’विजयाविषयी कांबळे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीला सुरुवात झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध प्रचार केला. आपणही निवडणुकीत भपका दाखविण्यापेक्षा सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्यासाठी प्रयत्न केला. बूथवाईज नियोजन केले. त्यामुळे मतदारसंघात घरोघरी पोहोचणे शक्य झाले. याबरोबरच केंद्र सरकारबाबत सकारात्मक प्रतिमा होती.’’ (प्रतिनिधी)