शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सद्य:स्थितीवरील एकांकिकाच होतात ‘क्लिक’: प्रवीण तरडे; ‘पुरुषोत्तम’साठी मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 12:15 IST

महाराष्ट्रीय कलोपासकच्या वतीने आयोजित पुरुषोत्तम करंडकच्या महाअंतिम स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्याकरिता प्रवीण तरडे यांचा मार्गदर्शन ‘क्लास’ नातूवाडा येथील इंदिरा मोरेश्वर सभागृहामध्ये झाला.

ठळक मुद्देप्रवीण तरडे यांचा मार्गदर्शन ‘क्लास’ झाला नातूवाडा येथील इंदिरा मोरेश्वर सभागृहामध्ये येत्या १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची रंगणार महाअंतिम फेरी

पुणे : ‘पुुरुषोत्तम’मध्ये सादर होणाऱ्या बहुतांश एकांकिकांवर मालिकांचा प्रभाव जाणवतो. त्यावर आधारित एकांकिकाच परीक्षकांच्या पसंतीस उतरतात, असा एक गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये आहे. म्हणूनच ते यशापासून दूर जात आहेत. समाजातील आसपास घडणाऱ्या किंवा सद्य:स्थितीवर भाष्य करणाऱ्या घटनांवर आधारित एकांकिकांचे सादरीकरण केल्यास त्या परीक्षक आणि प्रेक्षकांना अधिक ‘क्लिक’ होतात, अशा शब्दांत ‘पुरुषोत्तमीय’ प्रसिद्ध लेखक प्रवीण तरडे यांनी विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला.महाराष्ट्रीय कलोपासकच्या वतीने आयोजित पुरुषोत्तम करंडकच्या महाअंतिम स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्याकरिता प्रवीण तरडे यांचा मार्गदर्शन ‘क्लास’ नातूवाडा येथील इंदिरा मोरेश्वर सभागृहामध्ये झाला. याप्रसंगी संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई, राजेंद्र नागरे आणि नितीन आपटे यांच्यासह २०० विद्यार्थी उपस्थित होते. तरडे म्हणाले, की वायसीएममध्ये असताना पुरुषोत्तममध्ये कोणत्या एकांकिका सादर करायच्या, याचा आम्ही खूप गांभीर्याने विचार करायचो. या एकांकिकांची निवड करताना समाजात आसपास घडणाऱ्या घटना किंवा सद्य:स्थितीवर भाष्य करणाऱ्या घटनांवर अधिक भर देण्याचा आम्ही प्रयत्न करीत होतो. ज्या वेळी कारगिल युद्ध झाले होते, त्याच काळात एकांकिकांच्या निवडीचा कालावधी होता. पहिल्या निवडलेल्या एकांकिकेचा विषय बाजूला ठेवून युद्धाचा विषय निवडला आणि ‘पुरुषार्थ’ एकांकिका सादर केली. कोणतीही एकांकिका सादर करताना  ‘अभिनय,’ ‘दिग्दर्शन’ ‘वक्तृत्व’ आणि ‘वाचिक’ या गोष्टींवर भर दिला जाणे आवश्यक आहे. मात्र सध्या स्पर्धेत सादर होणाऱ्या एकांकिकांमध्ये नेपथ्य, प्रकाशयोजना यावरच अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना यश हुलकावणी देत आहे. पुरुषोत्तम हे प्रायोगिक सादरीकरणाचे व्यासपीठ आहे. त्याचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर झाला पाहिजे. स्पर्धेच्या आयोजनामध्ये संयोजक कमी पडत नाहीत. स्पर्धेतील कलाकारांची दर्जात्मक संख्या वाढली आहे; मात्र सादरीकरणाचा दर्जाही वाढायला हवा, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

१५ ते १७ डिसेंबर ‘पुरुषोत्तम’ची महाअंतिम फेरीयेत्या १५ ते १७ डिसेंबर या कालावधीत पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी रंगणार आहे. या फेरीमध्ये पुणे ३, नागपूर ३, कोल्हापूर ४, जळगाव ४ आणि रत्नागिरीचे ४ अशा १८ संघाच्या कलात्मक आविष्काराचे सादरीकरण होणार आहे. १७ डिसेंबरला महाअंतिम फेरीचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.

टॅग्स :Puneपुणे