शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाने वाचविले चिमुकल्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 02:29 IST

येथील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाने आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्याच्या डोहात बुडणा-या एका ७ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचविले.

रांजणगाव गणपती  - येथील रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाने आपल्या जिवाची पर्वा न करता पाण्याच्या डोहात बुडणा-या एका ७ वर्षाच्या मुलाचे प्राण वाचविले. खाकी वर्दीतील माणसाने माणुसकीचे दर्शन घडविल्याने पोलिसांच्या संवेदनशीलतेचे प्रत्यंतर आले.रघुनाथ भीमराव हाळनोर असे या पोलिसाचे नाव असून, त्यांनी चैतन्य दीपक जोरी (वय ७, मूळ केडगाव, अहमदनगर, सध्या रा.कारेगाव, ता.शिरुर) याचे प्राण वाचविले. घटनेची नोंद रांजणगाव पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास रांजणगाव पोलीस स्टेशनजवळ असलेल्या दगडखाणीच्या डोहात काही मुले खेळत होते. पाणी खोल असल्याने चैतन्य बुडत असल्याचे इतर मुलांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून रघुनाथ हाळनोर यांनी डोहाकडे धाव घेतली. पाण्यात बुडबुडे येत असल्याचे पाहून त्यांनी पाण्यात उडी मारली.चैतन्यला त्यांनी बाहेर काढून हाताने पंपीग करुन पोटातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला. पोलीस मित्र नानासाहेब पोटे यांच्या रुग्णवाहिकेतून त्वरित रांजणगाव गणपती येथील गजानन हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ नेले. त्याला पुढील उपचारार्थ ससून रुग्णालयात दाखल केले असून प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले.आई रोजदारंीवर कंपनीत काम करणारी व वडील चालक म्हणूनकाम करतात.या जोरी दाम्पंत्याचा दिपक हा एकुलता एक मुलगा असून तो या दुर्घटनेतून वाचल्याने रघुनाथ हाळनोर यांच्या रुपाने त्यांना देवच भेटल्याच्या प्रतिक्रया पालकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस