शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

प्रकाश जावडेकर म्हणतात, अरविंद केजरीवाल यांच्याबाबत मी तसं बोललोच नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 15:57 IST

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश जावडेकर यांनी पक्षाच्या दिल्लीतील पराभवाबाबत भाष्य केले.

ठळक मुद्देगोली मारो आणि भारत पाक ही विधाने भोवली,  हे शहांचं निरीक्षण बरोबर अरविंद केजरीवाल यांना आपण अतिरेकी म्हटलेच नव्हतेभाजपा हा शिकणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही या पराभवातून योग्य तो बोध घेऊ

पुणे -  दिल्ली विधानसभा निवडणुकीत सर्व शक्ती पणाला लावूनही भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, या पराभवानंतर भाजपा नेत्यांकडून पराभवाबाबत विविध कारणे समोर केली जात आहेत. त्यातच अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेली बेछूट टीका, गोली मारो, भारत पाकिस्तानसारखी वक्तव्ये भाजपाला भोवल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांना आपण अतिरेकी म्हटलेच नव्हते, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. पुण्यात  प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रकाश जावडेकर यांनी पक्षाच्या दिल्लीतील पराभवाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, ''अरविंद केजरीवाल हे अतिरेकी आहेत आणि त्याचे अनेक पुरावे आहेत, असे मी बोललोच नव्हतो. दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यावर काँग्रेस पक्ष दिल्लीतून लुप्त झालेला दिसत आहे. आता काँग्रेसची ही मते आपकडे वळली का हे माहीत नाही. मात्र त्यामुळे आप आणि भाजपामध्ये थेट लढत झाली. तसेच गोली मारो आणि भारत पाक ही विधाने भोवली,  हे शहांचं निरीक्षण बरोबर आहे. पण या पराभवा मागे इतरही कारणे आहेत. खरंतर भाजपा हा शिकणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही या पराभवातून योग्य तो बोध घेऊ.''असेही जावडेकर यांनी सांगितले. 

संबंधित महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results : ...म्हणून केजरीवालांच्या शपथविधीला इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण नाही

Delhi Election Results : भाजपा नेत्यांची वादग्रस्त विधाने भोवली, अमित शाह यांनी चूक कबूल केली 

गंभीर नसता तर भाजपाची अवस्था झाली असती आणखी गंभीर; जाणून घ्या कशी?दरम्यान,  केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी अध्यक्ष अमित शाह यांनी पक्षाच्या पराभवाची  कारणमीमांसा केली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाचे नुकसान झाल्याचे अमित शाह यांनी म्हटले होते. 'भाजपाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांची जेवढी चर्चा केली गेली, त्या तुलनेत राहुल गांधींच्या वादग्रस्त वक्तव्यांची चर्चा झाली नाही, असा दावाही अमित शाह यांनी केला. दरम्यान, काही निवडणुकांमध्ये पराभव झाला म्हणजे जनतेचा पक्षावरील विश्वास उडाला असे होत नाही. महाराष्ट्रात आम्ही जिंकलो होतो. हरयाणात आम्ही केवळ ६ जागा गमावल्या.  नक्कीच झारखंडमध्ये आमचा पराभव झाला. तर दिल्लीच आम्ही आधीच पराभूत झालो होतो. मात्र दिल्लीत  आमच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढली,'असेही अमित शाह यांनी यावेळी सांगितले.  

टॅग्स :Prakash Javadekarप्रकाश जावडेकरdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा