शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार प्रभाकर करंदीकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2018 04:09 IST

मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार आणि भरत नाट्य संशोधन मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर (वय ८४) यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले.

पुणे - मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार आणि भरत नाट्य संशोधन मंदिर संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर (वय ८४) यांचे प्रदीर्घ आजाराने शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्यामागे तीन विवाहित मुली आहेत. पार्थिवावर शनिवारी वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.ज्येष्ठ गायक पं. यशवंतबुवा मराठे आणि नंतर स्वरराज छोटा गंधर्व यांच्याकडून करंदीकर यांनी शास्त्रीय संगीताची तालीम घेतली. भरत नाट्य मंदिर, सेंट्रल रेल्वे कल्चरलअकादमी, मराठी रंगभूूमीच्या माध्यमातून त्यांनी संगीत रंगभूमीवर सुमारे पाचशेहून अधिक प्रयोग सादर केले.‘सौभद्र’, ‘मंदारमाला’, ‘स्वयंवर’, ‘संशयकल्लोळ’, ‘वैरीण झाली सखी’, ‘शाहीर प्रभाकर’ आणि ‘अभोगी’ या संगीत नाटकांमध्ये प्रमुख भूमिका केल्या होत्या. राज्य संगीत नाट्य स्पर्धेत सलग तीन वर्षे सुवर्णपदक पटकावण्याचा बहुमानही त्यांनी संपादन केला होता.पुणे महानगरपालितर्फे बालगंधर्व पुरस्काराने त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला होता. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी नरूभाऊ लिमये यांच्यानंतर भरतनाट्य संशोधन मंदिराच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी अनेक वर्षे सांभाळली.

टॅग्स :Puneपुणे