शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे रेल्वे स्थानकावरील विद्युत पुरवठा दोन तास खंडीत; पाच रेल्वे धावल्या उशीराने

By नितीश गोवंडे | Updated: August 27, 2022 19:00 IST

काही गाड्या पुणे स्थानकावर अडकून पडल्या होत्या...

पुणे :पुणे रेल्वे स्थानकावरील विद्युत पुरवठा खंडीत झाला आणि एकच गोंधळ उडाला. अनेक प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी उशीर तर झालाच पण पायपीट देखील करावी लागली. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास खंडीत झालेला विद्युत पुरवठा नऊच्या सुमारास पुर्ववत झाला. या दोन तासाच्या दरम्यान पाच रेल्वे उशीराने धावल्या. त्यामुळे काही गाड्या शिवाजी नगर ते पुणे स्थानकादरम्यान उभ्या होत्या, तर काही गाड्या पुणे स्थानकावर अडकून पडल्या होत्या.

मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकात शनिवारी सकाळी ओव्हरहेड इक्वीपमेंट (ओएचइ) ट्रीप झाल्याने सकाळी सात ते नऊ या वेळेत विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे पाच गाड्यांना सुमारे दीड तास उशीर झाला. सकाळी सव्वासात वाजता सुटणारी पुणे-मुंबई डेक्कन क्वीन एक्स्प्रेस पुणे स्थानकातून सव्वानऊ वाजता सुटली. यामुळे पुण्याहून मुंबईला कामानिमित्त प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना कामावर पोहोचण्यास उशीर झाला. या घटनेमुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर टीका करत चमकोगिरी करण्यापेक्षा योग्य काम करण्यावर भर देणे गरणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस आणि पुणे-लोणावळा लोकल या रेल्वे पुणे स्थानकातच उभ्या होत्या. तर सिंकदराबाद-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस आणि तिरूचिरापल्ली-गंगापल्ली हमसफर एक्स्प्रेस या रेल्वे शिवाजी नगर आणि पुणे स्थानकादरम्यान मध्येच अडकल्या होत्या. या दोन्ही गाड्या स्थानकावर न पोहोचल्याने यातील प्रवाशांनी मध्येच उतरून रेल्वे रूळावरून चालत स्थानक गाठले आणि निश्चित स्थळी प्रवास केला.

ओएचइ ट्रीप झाल्याने एक ते दीड तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करून विद्युत पुरवठा पूर्ववत केला. यामुळे पाच रेल्वे उशीराने धावल्या, पण दरम्यानच्या काळात डिझेलवर चालणाऱ्या गाड्या सुरू होत्या.- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणेमी डेक्कन क्वीनने मुंबईला जाण्यासाठी सकाळी रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी स्थानकातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे समजले. त्यामुळे प्रवाशांची प्रंचड गैरसोय झाली होती. याआधी देखील अनेकदा असे प्रकार झाले आहेत. नेहमी गर्दीच्या वेळी विद्युत पुरवठा कसा खंडित होतो ही विचार करण्याची बाब आहे.- हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवाशी मंच

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड