शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

महिलांमध्ये समाजपरिवर्तनाची ताकद - हर्षवर्धन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 02:53 IST

काँग्रेसच्या काळात महिला बचत गटांना ४ टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत महिला आर्थिक सबलीकरणाचे धोरण स्वीकारले होते. पुरुषांसोबतच महिलांनीही व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे यावे, याकरिता काँग्रेसने समानतेचा संदेश देत पुढाकार घेतला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : काँग्रेसच्या काळात महिला बचत गटांना ४ टक्के व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देत महिला आर्थिक सबलीकरणाचे धोरण स्वीकारले होते. पुरुषांसोबतच महिलांनीही व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे यावे, याकरिता काँग्रेसने समानतेचा संदेश देत पुढाकार घेतला होता. महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्यास, गावागावांतील दारूची बाटली उलटी करण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्याचे दाखवून दिले आहे, असे मत माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात स्व.इंदिरा गांधी जन्मशताब्दी उद्योगिनी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी पाटील बोलत होते. माजी आमदार उल्हास पवार, सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, इंटकचे अध्यक्ष कैलास कदम, नगरसेविका सुजाता शेट्टी, लता राजगुरू, प्रशांत सुरसे, आयुब पठाण, चेतन आगरवाल, उमेश काची, स्वाती शिंदे, कन्हैयालाल साहनी आदी उपस्थित होते. उस्मानाबाद येथील बचत गटाच्या चळवळीतून पुढे आलेल्या महिला उद्योजिका कमल कुंभार यांना मुख्य पुरस्काराने गौरविण्यात आले.पाटील म्हणाले की, सेवा, कर्तव्य, त्याग या तिन्ही शब्दांचे तंतोतंत पालन कोणत्या पक्षाने केले याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायला हवे. काँग्रेसने स्वातंत्र्यपूर्व काळापासून याचे पालन केले असून, सर्वधर्मसमभावाचा विचार घेऊन देश बांधण्याचे काम केले आहे.पवार म्हणाले की, मनामध्ये जिद्द असेल तर महिला कोणतेही काम करू शकतात. मात्र, सध्याचे पंतप्रधान हे इंदिरा गांधी यांचे नाव पुसण्याचे काम करीत आहेत, ते त्यांच्या ७ पिढ्यांनाही जमणार नाही, असेही त्यांनी सांगितले.जोशी म्हणाले की, पुण्यात बचत गटांची मोठी चळवळ सुरू असून, त्यातून अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आजच्या युगात बचत गटांना मार्केटिंगची आणखी गरज असून त्यांना ताकद देण्याचे काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. विकास आबनावे यांनी प्रास्ताविक केले. संगीता तिवारी यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. रमेश पवळे यांनी आभार मानले.शेळीपालन, कुकुटपालनापासून अनेक व्यवसाय कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता शेतजमिनी भाड्याने घेऊन केले. व्यवसायासाठी आपल्या गावातील भौगोलिक रचना, मागणी आणि इतर व्यवसायांची माहिती महिलांनी करून घेणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील ज्या महिला स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत, त्यांना आजूबाजूंच्या व्यवसाय क्षेत्राचे ज्ञान देण्यापासून ते कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याकरिता मदत करण्याचे माझे स्वप्न आहे. पुढील वर्षी २०१८ मध्ये तब्बल १० हजारहून अधिक महिलांना लघुउद्योजिका बनविण्यास मी साहाय्य करणार आहे.- कमल कुंभार 

टॅग्स :Puneपुणे