शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वीजवाहिनी तुटल्याने निम्म्या शहराची वीज गायब, पुढील दोन दिवस पेठांमध्ये येणार भारनियमनाची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:18 IST

नाल्यामध्ये साफसफाई करीत असताना जेसीबीमुळे महापारेषणची १३२ केव्हीची भूमिगत वीजवाहिनी तुटल्याची घटना बुधवारी दत्तवाडीतील फरशी पुलाजवळ घडली.

पुणे : नाल्यामध्ये साफसफाई करीत असताना जेसीबीमुळे महापारेषणची १३२ केव्हीची भूमिगत वीजवाहिनी तुटल्याची घटना बुधवारी दत्तवाडीतील फरशी पुलाजवळ घडली. त्यामुळे जीआयएस, तसेच ‘महावितरण’च्या सहा उपकेंद्रांचा वीजपुरवठा गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास खंडित झाला होता. त्यामुळे शहरातील शनिवार, नारायण, सदाशिव, कसबा, बुधवार, रविवार, शुक्रवार, मंगळवार, सोमवार, भवानी आणि नवी पेठेसह लुल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केट यार्ड, स्वारगेट या भागातील वीजपुरवठा बंद पडला. या ढिसाळ कारभाराचा फटका तब्बल अडीच लाख नागरिकांना बसला आहे. या भागांमध्ये पुढील दोन दिवस चक्राकार पद्धतीने ३ ते ४ तासांचे भारनियमन करण्यात येणार आहे.‘महापारेषण’च्या पर्वती २२० उपकेंद्रामधून भूमिगत वीजवाहिनीद्वारे रास्ता पेठ १३२ केव्ही जीआयएस उपकेंद्राला वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्रातील वाहिन्यांद्वारे ‘महावितरण’च्या सेंटमेरी, कसबा पेठ, मंडई, लुल्लानगर, गुलटेकडी व रास्ता पेठ या सहा उपकेंद्रांना वीजपुरवठा करण्यात येतो. फरशी पुलाजवळील नाल्यामध्ये जेसीबीच्या साहाय्याने कचरा साफ करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी सिमेंटचे काँक्रीट उखडण्यात आले. त्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे नुकसान झाले. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे वाहिनीमध्ये आर्द्रता वाढल्याने गुरुवारी दुपारी या वाहिनीचा स्फोट झाला. त्यानंतर रास्ता पेठ केंद्राचा वीजपुरवठा बंद पडला.या केंद्रावर अवलंबून असलेल्या अन्य सहा केंद्रांवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे ७० ते ८० मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन करून या भागातील ग्राहकांना वीज पुरविण्याचे प्रयत्न ‘महावितरण’ने सुरू केले. अन्य उपकेंद्रांमधून पर्यायी व्यवस्था करण्यासाठीही प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.दरम्यान, काही भागात नाइलाजास्तव चक्राकार पद्धतीचे भारनियमन सुरू करण्यात आल्याचे ‘महावितरण’ने कळविले आहे. या वाहिनीच्या दुरुस्तीसाठी, तसेच बंद पडलेल्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरू होण्यास दोन दिवस लागणार आहेत. ग्राहकांनी विजेचा वापर आवश्यकतेनुसार करावा, तसेच उद्योग किंवा व्यावसायिकांनी विजेऐवजी शक्य असल्यास जनरेटरचा वापर करावा, असे आवाहन ‘महावितरण’ने केले आहे.।या भागाला बसला फटकाशहराच्या मध्यवस्तीमधील रास्ता पेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, बुधवार पेठ, नवी पेठ, सदाशिव पेठ, गंज पेठ, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, लुल्लानगर, कोंढवा, कॅम्प, गुलटेकडी, मंडई, मुकुंदनगर, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड, रहेजा गार्डन, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, महर्षी नगर, मुकुंदनगर, मार्केट यार्ड, शंकरशेठ रोड, स्वारगेट, जिल्हाधिकारी कार्यालयाचा काही परिसर, पर्वती आदी परिसरालावीजवाहिनी तुटल्याचा फटका बसला.खोदकामात नादुरुस्त झालेली ‘महापारेषण’ची वीजवाहिनी विशिष्ट प्रकारची आहे. वाहिनीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारा जाइंट चेन्नई येथून विमानाने मागविण्यात आला आहे. शुक्रवारी या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम ‘महापारेषण’कडून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.