राजुरी गावचे माजी सरपंच माऊली शेळके व युवा नेते वल्लभ शेळके यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेले राजुरी ग्रामविकास पॅनेल हे सर्वसामान्यांना न्याय देणारे, मूलभूत गरजा ओळखून गावचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने कार्यरत आहे. या निवडणुकीत ग्रामविकास पॅनेलचे ७ उमेदवार विजयी झाले असून निर्विवाद बहुमत मिळविले आहे. १२ जागांसाठी ही निवडणूक झाली. या अगोदर ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
राजुरी ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे, सखाराम गाडेकर, रंगनाथ औटी, प्रिया हाडवळे, गौरव घंगाळे, शाकीर चौगुले, निर्मला हाडवळे, रुपाली औटी हे उमेदवार विजयी झाले.तर या पॅनेलचे ज्ञानेश्वर शेळके,सुवर्णा गटकळ,राजश्री रायकर हे तीन उमेदवार या अगोदर बिनविरोध निवडून आले आहेत.त्यामुळे या पॅनेलचे १० उमेदवार झाले आहेत. तर विरोधी गटाला राजुरी पॅनेललचे मारुती घंगाळे,सुप्रिया औटी,चंद्रकांत जाधव,किशोरी औटी,शीतल हाडवळे हे उमेदवार विजयी झाले तर या पॅनेलचे मीना औटी व एकनाथ शिंदे हे दोघेजण बिनविरोध निवडून आले आहेत.त्यामुळे या पॅनेलचे ७ उमेदवार झाले आहेत.सर्व विजयी उमेदवारांचे माऊली शेळके, पप्पू हाडवळे,अविनाश पाटील औटी,जि.के. औटी,गुलाम नबी शेख,वल्लभ शेळके,डी.बी. गटकळ आदींनी अभिनंदन केले.
२७ बेल्हा राजुरी
राजुरी येथील ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार .