शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीतील बटाटा वाण सडले, बाजारभाव कमी , आतापर्यंत केवळ ५८ ट्रक वाणाची विक्री  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 02:00 IST

रब्बी हंगामातील बटाटा वाणाला अजिबात मागणी नाही. बटाटा वाणाचे बाजारभाव कमी असूनही शेतकरी बटाटा वाण लागवडीसाठी नेत नाहीत. यावर्षी केवळ २५ ते ३० टक्के क्षेत्रात बटाटा लागवड होणार आहे. विक्रीअभावी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा वाण सडू लागले आहे.

मंचर : रब्बी हंगामातील बटाटा वाणाला अजिबात मागणी नाही. बटाटा वाणाचे बाजारभाव कमी असूनही शेतकरी बटाटा वाण लागवडीसाठी नेत नाहीत. यावर्षी केवळ २५ ते ३० टक्के क्षेत्रात बटाटा लागवड होणार आहे. विक्रीअभावी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत बटाटा वाण सडू लागले आहे.मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती बटाटा वाणासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. रब्बी व खरीप या दोन्ही हंगामात बटाटा वाण विक्रीसाठी उपलब्ध असते. नोटाबंदीनंतर त्याचा परिणाम बटाटा वाणाच्या खरेदीवर झाला होता. त्याचा परिणाम होऊन खरीप हंगाम वाया गेला. जून व जुलै या दोन महिन्यांत केवळ १०४ ट्रक बटाटा वाणाची विक्री झाली. या वेळी क्विंटलला ५०० ते १००० रुपये बाजारभाव होता. रब्बी हंगामात बटाटा वाणाची आतापर्यंत केवळ ५८ ट्रक विक्री झाली आहे. मागील वर्षी या वेळेपर्यंत सव्वाशे ट्रक वाणाची विक्री झाली होती.यावर्षी केवळ २५ ते ३० टक्के बटाटा वाणाची विक्री होऊन लागवड होईल, असे व्यापारी संजय मोरे यांनी सांगितले. बटाटा वाणाला मागणी कमी होण्याची अनेक कारणे आहेत. गेली तीन वर्षांपासून उत्पादित बटाटा पिकाला अपेक्षित बाजारभाव मिळत नाही. शेतकºयांचे भांडवल अंगावर येत आहे. उसाला चांगला भाव मिळत असल्याने अनेक शेतकºयांनी बटाटा पिक घेण्याऐवजी उसाचे पिक घेण्यास प्राधान्य दिले आहे. नोटाबंदी बरोबरच सतत पडणारा पाऊस हेसुद्धा बटाटा लागवड कमी होण्याचे कारण असून शेतकरी बटाटा लागवड करू इच्छित नाही.पंजाब राज्यातून बटाटा वाण विक्रीसाठी येतो. बटाटा वाणाला मागणी नसल्याने पंजाब राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या मंचर बाजार समितीत ४० ट्रक बटाटा वाणाची आवक झाली आहे. मात्र त्याला मागणी नाही.बटाटा वाणाला बाजारभाव कमी आहे. सध्या क्विंटलला ८०० ते ११०० रुपये असा बाजारभाव आहे. मागील वर्षी हाच भाव २७०० रुपये होता. सध्या बटाटा वाण केवळ ठराविक स्थानिक शेतकरी खरेदी करतात. आॅक्टोबर महिन्यात सातारा, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, औरंगाबाद येथील शेतकरी बटाटा वाण खरेदीसाठी येत असतात. ते आले तर थोडीफार बटाटा वाणाची विक्री होईल, अन्यथा बटाटा सीझन वाया जाणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणे