शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पोस्टल मतदानाचा टक्का ९० पर्यंत वाढणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 07:00 IST

जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ या चारही लोकसभा मतदार संघांची मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडलेली असून आता सर्वांचे लक्ष येत्या २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा अंदाज : सैनिकांनी घेतला ऑनलाईन प्रक्रियेचा लाभ पुणे लोकसभा मतदार संघात ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदानयंदा मतदान प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर

पुणे : जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील अधिकाधिक सैनिक मतदारांनी त्यांच्यासाठी राबविण्यात आलेल्या आॅनलाईन प्रक्रियेचा लाभ घेतला आहे. तसेच निवडणूक कामास नियुक्त केलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुध्दा मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे यंदा पोस्टल मतदानाची टक्केवारी ९० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ या चारही लोकसभा मतदार संघांची मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडलेली असून आता सर्वांचे लक्ष येत्या २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर सर्व प्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाते. त्यामुळे निवडणूक कामास असणारे कर्मचारी व अधिकारी यांच्या मतपत्रिकांची मतमोजणी केली जाईल. त्यातही यंदा सैनिकांना ऑनलाईन प्रणालीचा वापर करून बारकोड असलेल्या मतपत्रिका देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मतपत्रिकांची मोजणीसाठी विशिष्ट स्कॅनरच्या सहाय्याने केली जाईल.जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात एकूण ५ हजार ७६० सैनिक मतदार असून सर्वांना ऑनलाईन पध्दतीने मतपत्रिका उपलब्द्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातील काही मतदारांनी संबंधित लोकसभा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपर्यंत मतदान केलेल्या मतपत्रिका पाठविल्या आहेत. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ५० टक्के सैनिक मतदाराच्या मतपत्रिका पोहचल्या आहेत. मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या मतपत्रिकांचाच विचार या निवडणूक प्रक्रियेत केला जाणार असून सकाळी ८ वाजल्यानंतर येणाºया मतपत्रिका गृहित धरल्या जाणार नाही. पुणे लोकसभा मतदार संघात ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले. त्यामुळे विविध स्तरावर त्यावर चर्चा झाली. परंतु, सैनिक मतदारांच्या मतपत्रिकांचा ओघ पाहता सैनिकांचे मतदान ९० टक्क्यांपर्यंत जाण्याची शक्यता,असल्याचे पोस्टल मतदान प्रक्रियेचे समन्वयक व उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी सांगितले.-- यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत केवळ टपाली पध्दतीने मतदानाचा वापर केला जात होता. त्यामुळे सैनिक मतदारांचे मतदान कमी होत होते. जिल्हा प्रशासनाने पोस्टाने पाठविलेली मतपत्रिका पुन्हा पोस्टानेच परत येण्यास बराच कालावधी जात होता. दरम्यानच्या कालावधीत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होत होती. परंतु, यंदा मतदान प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने अधिक अधिक सैनिक मतदारांना मतदानाचा हक्क बजवता आला. त्यामुळे पोस्टल मतपत्रिकांच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येईल, अशी शक्यता जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेVotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकIndian Armyभारतीय जवान