शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट-टेलिकॉम पतसंस्थेचे रोखीचे व्यवहार संशयास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:01 IST

भारत संचार निगम लिमिटेड आणि पोस्टाच्या आरएमएस खात्यातील सरकारी अधिकारी-कर्मचारी वर्गाची ही पगारदार पतसंस्था असून, तिचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय आहे.

ठळक मुद्देफेर लेखापरीक्षणाचे सहकार विभागाचे आदेश प्राप्तिकर विभागालाही व्यवहारांची दिली माहितीरोखीने स्वीकारलेल्या ठेवी व कर्ज वसूली या कामातही अनियमितता दिसून येत असल्याचा ठपका

पुणे : दि पुणे पोस्ट अ‍ॅण्ड टेलिकॉम को आॅप क्रेडीट सोसायटीचे २०१५ ते २०१७-२०१८ पर्यंतच्या कालावधीचे फेर लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. संस्थेतील रोखीच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती सहकार विभागाने आयकर विभागाला कळविली असून, आपल्या खात्यामार्फत पुढील कार्यवाही करण्याचे सुचविले आहे. भारत संचार निगम लिमिटेड आणि पोस्टाच्या आरएमएस खात्यातील सरकारी अधिकारी-कर्मचारी वर्गाची ही पगारदार पतसंस्था असून, तिचे कार्यक्षेत्र राज्यस्तरीय आहे. संस्थेचे सभासद गणेश तिखे यांनी संबंधित संस्थेची तक्रार सहकार आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर सहकारविभागाने या संस्थेच्या तपासणीसाठी पथक नियुक्त केले होते. त्यानुसार लेखापरीक्षकांनी केलेल्या तपासणीत सांस्कृतिक भवन, संस्था इमारत वापर, ठेवी व कर्जव्यवहार, वाहन वापर, नफा विभागणी, दैनंदिन शिल्लकीचे उल्लंघन, भेटवस्तू वाटप, हातावरील रोख शिल्लक रक्कमेचे उल्लंघन झाल्याचे समोर आले. रोखीने स्वीकारलेल्या ठेवी व कर्ज वसूली या कामातही अनियमितता दिसून येत असल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवला.संस्थेच्या २०१७-१८मधील वैधानिक लेखापरीक्षण अहवालात अनियमितता झाली असल्याचा शेरा मारण्यात आला आहे. मात्र, यात संस्थेचे झालेले आर्थिक नुकसान, कर्ज, नियम व कमाल मयार्देचे व्यवहारातील उल्लंघन, संस्था पदाधिकाºयांच्या कर्ज मंजुरीबाबत सह्या नसलेली कर्ज प्रकरणे, कर्जदारांची सह्या नसलेली कर्ज प्रकरणे, प्राप्तीकर कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करुन केलेले रोखीचे व्यवहार याबाबत सुस्पष्ट तपशील नमूद न करता मोघम शेरे नोंदविले आहेत. या दोन्ही प्रकारावरुन संबंधित संस्थेच्या कामकाजात अनियमितता दिसून येत असल्याचा ठपका सहकार आयुक्तांच्या आदेशात ठेवण्यात आला आहे. त्यावरुन या संस्थेचे पुन्हा लेखापरीक्षण करावे असे आदेश सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी दिले आहेत. त्यासाठी विशेष लेखापरीक्षक अजय देशमुख यांची नियुक्ती करावी, असे १४ आॅगस्टरोजी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. सहकार कार्यालयाने केलेल्या तपासणी अहवालात दि पुणे पोस्ट्स अँड टेलिकॉम को आॅप क्रेडीट सोसायटीने संस्थेच्या कर्ज खात्यावर व ठेवीच्या रक्कमा रोखीने स्वीकारल्याचे दिसत आहे. संस्थेने प्राप्तीकर कायद्याचे उल्लंघन करुन रोखीने रक्कमा स्वीकारल्याचे तपासणी पथकाने नमूद केले आहे. या मुद्द्यांच्या मार्फत आपण योग्य ती कार्यवाही करावी असे पत्र अपर निबंधक (पतसंस्था) पी. एल. खंडागळे यांनी प्राप्तीकर विभागाच्या उपायुक्तांना पाठविले आहे. 

टॅग्स :PuneपुणेbankबँकBSNLबीएसएनएलPost Officeपोस्ट ऑफिस