पुणे : मतदानासाठी कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावरील टपाल कार्यालय २० व २१ फेब्रुवारी रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. येथील कामकाज पुणे स्टेशनजवळील मुख्य टपाल कार्यालयातून चालणार असल्याची माहिती पुणे विभागाचे पोस्टमास्टर जनरल गणेश सावळेश्वरकर यांनी दिली.महापालिका निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. यासाठी मतदान केंद्र या कार्यालयाा असणार आहे. त्यासाठी दोन दिवस येथील काम बंद ठेवण्यात येईल. या कार्यालयातील संगणक व इतर साहित्य हलविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या रविवारी (दि. १९) देखील विशेष बाब म्हणून टपाल कार्यालयाचे कामकाज सुरूच राहील. (प्रतिनिधी)
कोंढव्यातील टपाल कार्यालय २ दिवस बंद
By admin | Updated: February 17, 2017 05:19 IST