शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

11th Admission | अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 20:07 IST

जाणून घ्या कशी असेल प्रवेश प्रक्रिया

पुणे : शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविल्या जाणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आले असून विद्यार्थ्यांना येत्या १ मे पासून प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करून दिला जाणार आहे. दरवर्षाप्रमाणे यंदाही दहावीचा निकाल प्रसिध्द होण्यापूर्वी अकरावी ऑनलाईन प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू केली असून त्याचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे आणि भरलेल्या पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळावा, या उद्देशाने शिक्षण विभागातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षांपासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. यंदाही मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पध्दतीने दिले जाणार आहेत. उर्वरित कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश महाविद्यालय स्तरावर दिले जाणार आहेत.

सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयांनी याबाबत विद्यार्थी व पालकांना आवश्यक मार्गदर्शन करावे. तसेच प्रवेशाबाबतचे आवश्यक नियोजन व कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना राज्याचे माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी दिल्या आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रिया प्रत्यक्षात येत्या मे महिन्यात सुरू होणार आहे. परंतु, शिक्षण उपसंचालकांनी विद्यार्थी, पालक, कनिष्ठ महाविद्यालये यांचे उद्बोधन,  प्रशिक्षण व जनजागृती करावी, अशा सूचना पालकर यांनी दिल्या आहेत.

 कालावधी                  कार्यवाहीचे टप्पेएप्रिल २०२२                विद्यार्थी,पालक,महाविद्यालयांमध्ये जागृती करणे१ ते १४ मे २०२२           संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग १ भरण्याचा सराव१७ मे ते निकालापर्यंत      नोंदणी व प्रवेश अर्जाचा भाग १ भरण्यास प्रत्यक्ष सुरूवात१७ मे ते निकालापर्यंत     महाविद्यालयांनी भरलेली माहिती तपासून व्हेरिफाय करणेदहावी निकालनंतर       पाच दिवस अर्जाचा दुसरा भाग भरण्यास मुदतदहावी निकालनंतर       पाच दिवस विविध कोट्यातील प्रवेश सुरू राहणारप्रवेशासाठी तीन नियमित फेऱ्या-अकरावी प्रवेशासाठी या वर्षी सुध्दा तीन नियमित फे-या राबविल्या जाणार आहेत. त्यात पहिल्या फेरीसाठी १० ते १५ दिवस, दुस-या व तिस-या फेरीसाठी प्रत्येकी ७ ते ९ दिवस दिले जाणार आहेत. त्यानंतर विशेष फेरी व उर्वरित विद्यार्थ्यांसाठी प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य फेरी ऐवजी वेटिंग लिस्ट पध्दतीचा अवलंब करून प्रवेश दिले जाणार आहेत.