शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोंढव्यातील दोन फ्लॅटमधून ५४ मांजरे ताब्यात, रहिवाशांनी सुटका सुटकेचा निश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 23:41 IST

मांजरीवर जिवापाड प्रेम करणा-या पण त्याचा सोसायटीतील इतरांना होत असलेल्या असह्य त्रासमुळे शेवटी अ‍ॅनिमल वेलफेअरच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कोंढवा पोलिसांनी ब्रम्हा होरियन सोसायटीतील दोन फ्लॅटमधून तब्बल ५४ मांजरांना ताब्यात घेतले. यासर्व मांजरांना अनिमल वेलफेअरच्या भूगाव येथील अनाथालयात ठेवण्यात येणार आहे. 

पुणे, दि. 12 - मांजरीवर जिवापाड प्रेम करणा-या पण त्याचा सोसायटीतील इतरांना होत असलेल्या असह्य त्रासमुळे शेवटी अ‍ॅनिमल वेलफेअरच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कोंढवा पोलिसांनी ब्रम्हा होरियन सोसायटीतील दोन फ्लॅटमधून तब्बल ५४ मांजरांना ताब्यात घेतले. यासर्व मांजरांना अनिमल वेलफेअरच्या भूगाव येथील अनाथालयात ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांपासून होत असलेल्या त्रासातून मुक्त झाल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला़कोंढवा पोलिसांकडे अनिमल वेलफेअरच्या अधिकारी मेहेर मथरानी यांनी सोमवारी फिर्याद दिली़ पोलिसांनी दिपिका कपूर व संगीता कपूर यांच्यावर गुन्हा दाखल केला़ त्यानंतर सोमवारी रात्री ब्रम्हा होरियन सोसायटीतील ए ३ विंगमधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये अ‍ॅनिमल वेलफेअरचे कार्यकर्ते व पोलीस गेले़ या घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता़ याठिकाणी त्या रहात नव्हत्या़ रात्री अपरात्री येऊन या मांजरांना त्या खाणे टाकत असत़ आतमधील दृश्य अतिशय किळसवाणे होते. सर्वत्र मांजरी फिरत होत्या़ घरातील बेडशीट, चादरी, खेळणी या मांजरांनी फाडून टाकल्या होत्या़ त्यांच्या चिध्या केल्या होत्या़ मांजरीचे मलमुत्र, विष्ठा साफ न केल्याने सर्वत्र दुर्गधी पसरली होती़ त्याचा या इमारतीतील सर्वांनाच त्रास होत होता. सोमवारी रात्री या घरातून २९ मांजरींना ताब्यात घेण्यात आले़ त्यांना भूगावला पाठविण्यात आले़त्यानंतर मंगळवारी कपूर राहत असलेल्या ए १ विंगमधील पाचव्या मजल्यावर पोलीस व कार्यकर्ते गेले. पण, या दोन्हींना दरवाजा उघडण्यास नकार दिला. काय बोलायचे ते आमच्या वकिलांशी बोला असे त्यांचे सांगणे होते़ जवळपास तासभर पोलिसांचा प्रयत्न सुरु होता पण, त्यांनी दाद लागून दिली नाही. शेवटी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पुढे करुन महापालिकेचे कर्मचारी आहोत, घराची साफसफाईची पाहणी करण्यासाठी आल्याचा बहाणा केला़ तेव्हा त्यांनी दरवाजा किलकिला केला़ त्याचा फायदा घेऊन अ‍ॅनिमल वेलफेअरचे कार्यकर्ते आत घुसले़ त्यांनी या घरातून २५ मांजरे ताब्यात घेतली़ त्यावेळी काही मांजरे पळून गेली. जवळपास तीन तास ही कारवाई सुरु होती़या मांजरांशिवाय सोसायटीच्या आवारात आणखी २० -२५ मांजरे मोकाट फिरत असतात. या दोन्ही त्यांना खायला टाकत असत. त्यांना ती वेळ नेमकी माहिती झाल्याने त्यावेळेला ते सोसायटीत जमा होत असतात़ या मांजरांमुळे या दोन्ही विंगमधील पाचव्या मजल्यावर राहणा-या रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता़ मांजरांचे केस व त्यांच्या विष्ठेमुळे घशाचा त्रास, दम्याचा त्रास होत होता़कपूर यांनी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधून कोंढवा पोलीस व अ‍ॅनिमल वेलफेअर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तब्बल २५ मांजरे पकडली आहेत़ त्यासाठी मोठी शिकस्त करावी लागली़ अनेकदा विनंती करूनही फ्लॅटमधून येत असलेल्या दुर्गंधीचा उपाय केला जात नव्हता़ ज्या दुर्गंधीचा त्रास ए ३ मधील रहिवासी अनेक वर्षांपासून सहन करत होते. हे रहिवासी विशेषत: लहान मुले आजारी पडत होती, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन पुनीत ओबेरॉल यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणे