शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या शाळांमधील पोषण आहाराचे काम बचत गटांच्या महिलांनाच द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:23 IST

अनेक तक्रारी आल्यानंतर केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी सेंट्रल किचन पध्दती राबविण्याचे खास धोरण तयार केले.

ठळक मुद्देपक्षनेत्यांच्या बैठकीत सर्वपक्षांची आग्रही मागणी

पुणे : केंद्र शासनाच्या धोरणानुसार चालू शैक्षणिक वर्षांपासून शहरातील अंगणवाड्या आणि महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सेंट्रल किचन पध्दतीनुसार पोषण आहार देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. परंतु पोषण आहारासाठीच्या सेंट्रल किचन धोरणाला बचत गटांनी विरोध केला असून, यामुळे अनेक महिलांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे. यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करून पोषण आहाराचे काम बचत गटांच्या महिलांनाच देण्याची आग्रही मागणी सर्व पक्षीय सदस्यांनी घेतली.    महिला सक्षमीकरणं आणि सबलीकरासाठी गेल्या १२  वर्षापासून स्थानिक बचतगटामार्फत अंगणवाडी, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना  पोषण आहार देण्याचे काम केले जात आहे. दरम्यानच्या काळामध्ये याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर केंद्र शासनाने विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी सेंट्रल किचन पध्दती राबविण्याचे खास धोरण तयार केले.  या  धोरणाला  शहरातील महिला बचत गटाचा कडाडून विरोध असताना देखील ही टेंडर प्रक्रिया राबवली गेली. या टेंडर प्रक्रियामध्ये बचत गटाच्या नावाखाली काही कंपन्यांनी भाग घेतला. त्याला बचतगटांनी विरोध केला. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अपात्र असलेले बचत गट पात्र करुन घेतले असा आरोप नगरसेविका  प्रिया गदादे पाटील यांनी सर्वसाधारण सभेमध्ये केला. त्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी कार्यालयात बैठक घेण्याचे आदेश दिले.  त्यानुसार महापौर कार्यालयात बैठक झाली. उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे,   शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, विरोधीपक्षनेते दिलीप बराटे, कॉग्रेसचेगटनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल , नगरसेविका प्रिया गदादे पाटील, अश्श्विनी कदम , आयुक्त सौरभ राव, आदी उपस्थित होते.  शहरातील  अंगणवाडी आणि पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे काम पात्र ठरलेल्या बचत गटांना  काम दयावे, अशी आग्रही भुमिका सर्वपक्षीय नेत्यांनी मांडली. -------------------चौकशी समिती पाच दिवसात अहवाल सादर करणार पोषण आहार  टेंडर प्रक्रिया मध्ये बचत गटाच्या नावा खाली काही कंपन्यांनी भाग घेतला. अपात्र बचत गटांना पात्र करण्याची किमया करण्यात आली आहे. याबाबत चौकशी समिती नेमुन तकारदाराची सुनावणी घेतली जाणार आहे.ही समिती पाच दिवसात अहवाल सादर करणार आहे असे महापालिकेतील अधिका-यांनी सांगितले.  -----------------------महापालिकेच्या आवारामध्ये आंदोलनशालेय पोषण आहार प्रणालीमधील गैर कारभाराची चौकशी करा, अपात्र संस्थांना दिलेलेल काम त्वरीत रद्द करून या संस्थांना काळ््या यादीत टाका, संबंधित दोषी अधिका-यावर कारवाई करा, आदी मागण्यासाठी पोषण आहार सेवा संघटनेच्या वतीने मंगळवारी ज्येष्ठ कामगार नेत्या किरण मोघे यांच्या नितृत्वाखाली महापालिकेच्या आवारामध्ये आंदोलन केले. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWomenमहिलाSchoolशाळा